संगोपन हॉस्पिटल मार्फत कॅन्सर जनजागृती व तपासणीचे मोफत शिबिर संपन्न
संगोपन हॉस्पिटल मार्फत कॅन्सर जनजागृती व तपासणीचे मोफत शिबिर संपन्न
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : तालुक्यातील नरेवाडी गावात कै. गुंडू (हमाल) अन्नाप्पा पाटील शैक्षणिक सामाजिक मेडिकल ट्रस्टच्या संगोपन हॉस्पिटल व रिसर्च सेंटरच्यावतीने ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर, इंडियन कॅन्सर सोसायटी आणि लाईफ विन्स फाऊंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कॅन्सर तपासणी शिबीर संपन्न झाले.
ह्या शिबिराचे उद्घाटन गडहिंग्लज प्रांत अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी केले. एडिशनल डी एच ओ उत्तम मदने यांच्या उपस्थितीत हे शिबिर पार पडले.
शुक्रवार ते रविवार दि.३,४, ५ असे तब्बल तीन दिवस चाललेल्या या शिबिरात सुमारे पाचशेहून अधिक लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला. स्त्रियांच्या स्तनाचा कर्करोग,गर्भाशयाच्या गाठी व कॅन्सर यांची तपासणी स्त्री रोग तज्ञांच्या कडून झाली.
यावेळी संगोपन हॉस्पिटलचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉ अर्जुन शिंदे यांनी शिबिराचे महत्त्व विषद केले आणि अशी सुमारे शंभर शिबिराचे आयोजन कोल्हापूर जिल्ह्यात करणार असल्याचे सांगितले.
"कोल्हापूर जिल्ह्यातील कँसर रुग्णांचा आलेख कमी करण्यासाठी आम्हीं सर्वोत्तपरी प्रयत्न करत आहोत. त्यासाठीच सेवाभावी हेतूनेच हॉस्पिटलची उभारणी केली आहे, त्याचा लाभ " असे ट्रस्ट व हॉस्पिटलचे अध्यक्ष मच्छिंद्रनाथ पाटील यांनी प्रतिपादन केले.
शिबिरासाठी लागेल ती मदत करण्याची ग्वाही प्रांत साहेबांनी यावेळी दिली. स्वागत मच्छिंद्रनाथ पाटील यांनी केले तर आभार सरपंच अंकुश पाटील यांनी केले. इंडियन कँसर सोसायटीचे व्यवस्थापक अशोक चव्हाण आणि ऑनको लाईफ कॅन्सर सेंटरच्या स्टाफचे विशेष सहकार्य लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!