कोयना धरण
सातारा: आज दि. 13 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजता धरणाची पाणी पातळी 2163 फूट 0 इंच झाली असून धरणामध्ये 104.60 TMC पाणीसाठा झाला आहे.
पाणलोट क्षेत्रामधील पर्जन्यमानामुळे धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असलेने धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दि. 13 सप्टेंबर 2021 रोजी संध्याकाळी 5 वाजता धरणाची वक्रद्वारे एकूण 4 फुट 9 इंच उचलून सांडवा व पायथा विद्युत गृहाद्वारे एकूण 45000 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडणेत येणार आहे. तसेच, धरणामधील आवक वाढल्यास सदर विसर्गामध्ये वाढ होणार असल्याने कोयना नदीपात्रा जवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!