नायब तहसीलदारांच्या कारवाईचे चुकीचे वृत्त प्रसिद्ध केलेमुळे शेतकरी अडचणीत...
नायब तहसीलदारांच्या कारवाईचे चुकीचे वृत्त प्रसिद्ध केलेमुळे शेतकरी अडचणीत...
अक्कलकोट ( वीरभद्र पोतदार) : तालुक्यातील दुधनी मधील शेतकरी रघुनाथ धोञे यांचा शेतात शेततळ्याचे काम करत होते. याची कोणीतरी चुकीची माहिती नायब तहसीलदार संजय राऊत यांना दिली. त्यांनीही या माहितीच्या आधारे अचानक धाड घालून चौकशी केली असता तिथे असे कोणतेही गैर कृत्य होत नसलेबाबत त्यांची खात्री झाल्यामुळे ते तिथून निघून गेले.पण या घटनेची कोणतीही शहानिशा न करता नवशिक्या बातमीदाराने ..."तहसीलदाराची कारवाई'' असे वृत्त प्रसिद्ध केले. त्यामुळे परीसरातील जेसीबी चालकानी धसका घेऊन गैरसमजुतीतून रघुनाथ धोत्रे या शेतकर्याच्या शेततळ्याचे काम करण्यास नकार देत आहेत. ह्या घटनेला आज ८ ते ९ महिने झाली आहेत. पण तरीही कोणीही मशिनवाला शेतकऱ्यांच्या मदतीला येत नाही.
त्यामुळे स्थानिक तलाठी व सदर नायब तहसीलदारांनी सदर शेतकऱ्याला अभय देऊन "ना हरकत खुलासा पत्र" द्यावे. हे रास्त होऊ शकेल. तसंच ज्या बातमीदराने खोडसाळ वृत्ताचे स्पष्टीकरण देऊन पत्रकारितेची बूज राखावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!