वादळाची परिक्षा घेऊ नका!
सहनशीलतेचा कडेलोट झालाय!
अन्यायग्रस्त चौथास्तंभ! उघडा डोळे! बघा नीट!
मान्यवर ,....अत्यंत वेदनेने व खेदाने लिहिवे लागलय!*
!
मविआ सरकारातील सर्व जीव तोडून काम करतात असे किमान दिसते आहे!
कोरोनाविरूद्घ लढाईतही आपला महाराष्ट्र अग्रेसर आहे! वर्तमानस्थितीतला सत्तासंघर्ष फारच भयंकर आणि याच्या झळा अप्रत्यक्षपणे मतदारांना आणि जनहितासाठी काम करू इच्छितात त्यांना लागत आहेत! विरोधक हे काही परदेशातून की परराज्यातून फक्त पोट भरण्यासाठी महाराष्ट्रात आलेले नाहीत! तेही महाराष्ट्रातीलच!
राज्यात कोरोनाविरूद्घ लढाईसाठी मूलभूत निर्देश हे केंद्रांच्या गाइडलाइन नुसार आखून राज्यांना पाठवले जातात! महाराष्ट्र हे भारतात येते आम्हीही देशाचे नागरिकच!
मात्र सत्तासंघर्ष नाट्य इतक्या खालच्या पातळीवर गेलेय की कोणीही उठतय ,कुठल्याही भाषेत बोलतय! सर्वसामान्य जनतेला प्रश्न पडलाय की, यांना आम्ही मतदान केलेय,आमचे नेतृत्व करण्याची संधी दिली ती काय असे थैमान आणि सूड ,आकसाचे राजकारण करण्यासाठी?
बरं तर बरं , कामासाठी, याचे वेतन व निधीसाठी पैसा कुठून येतो?आमचेच पैसे असतात ना? एकदा आमदार झाल्यानंतर कायमची पेन्शनही मिळते!सगळ्या सुविधांसह मान सन्मान मिळतो तोही जनतेनेच दिलाय! कुणीही मालक नाहीत!
लोकसेवक जनतेचे पालक असतात,राज्याच्या हिताची जबाबदारी याचेवर सोपवली आहे! जनतेचा पैसा हे जनतेसाठी वापरतात! ही लोकशाहीने दिलेली देण आहे,मोठी जबाबदारी आहे!
आजवर आपल्या संताची परंपरा ,सुधारकांची भूमी असलेल्या महाराष्ट्राने हक्कासाठीच्या लढाया पाहिल्या , मुंबई सह महाराष्ट्र, बेळगावसह महाराष्ट्र आंदोलने पाहिली! मुंबईवर हक्क सांगणारे अनेक आले नि गेले ,पुरोगामी अशा महाराष्ट्राने बॉम्ब स्फोट ही पचवले! सहकार क्षेत्राने केलेली क्रांती पाहिली ,श्रमिकांच्या ,भूमिपुत्रांच्या हक्काचा भगवा आवाजही इथलाच!
लाखो करोडोचे जगणे सोनेरी करणारी मायानगरी ,चित्रपटाचा पाया रोवणारी माणसंही इथलीच!जातीधर्मभेदापलीकडे जाऊन सर्वाना सामावून घेणारा आमचा महाराष्ट्र!
मात्र आज महाराष्ट्र आक्रोशित, संतप्त आहे! ज्यालाआपण समाजाचा आरसा म्हणतो,लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतो,त्याचीच दैना झालीय! काय लोकासमोर न्यावं ,काय मांडू नये याचं भान राहिले नाही! नीतीमूल्य गुंडाळून लाईव्ह वादावादी सादरीकरण करणारे ,काहीही प्रतिक्रिया दिल्यावर ती दाखवणे उचित असते का? एकाने भडकावू बोलल्यावर त्यावर प्रतिक्रिया विचारून काड्या लावणे तेच दिवसभर चर्वण करणे याला पत्रकारिता म्हणतात? या कोरोना आपात्कालीन काळात तर सर्वसमावेशक जनता या अशा प्रकाराना विटली आहे! माहिती ची बातमी होताना मसाला मारण्याचा प्रकार वाढलाय, सुपारी पत्रकारिता करणारे चाचे आक्रमण करून चौथा स्तंभाचे सामाजिक बांधिलकीचे काम विसरून गेलेत!
आणि या सगळ्याचा फायदा चमकेश व जनसेवेचे भान विसरलेले लोकं घेताना दिसत आहेत!
कृषी कायदे शेतकरी हिताचेच हवेत,श्रमिक कायदे,पत्रकार कायदे त्याचे हिताचेच हवेत! जर केद्र सरकारातील धोरणात्मक निर्णय घेणारे विद्वान एकांगी किवा झापडं लावून अन्यायकारक भूमिका लादणार असतील तर पक्षभेद बाजूला सारून महाराष्ट्र व येथील लोकाच्या हितासाठी काम व्हायलाच हवे,कारण आमची मते ही महाराष्ट्राच्या हितासाठी दिली आहेत हे आमदार असो की खासदार असो,यांनी डोक्यात पक्क ठेवायला हवे!
राज्यांना स्वतंत्र हितकारक धोरण तयार करण्याचे ,ते राबवण्याचे अधिकार आहेत! कृषीविषयक हितकारक धोरणाबाबत मा मुख्यमंत्री बोलतात! आश्वासन देतात!मग चौथ्या स्तंभाबाबत का बोलत नाहीत?कोणी अडवलय?
सत्तेसाठी रात्री,पहाटे कधीही राजकारण करा ,आमच काही म्हणण नाही! मात्र या सगळ्याची झळ महाराष्ट्राला व जनतेला बसता कामा नये! ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे!
राजकारणात शत्रुत्व उपयोगाचे नाहीआणि ते कायम नसावेही!
मागील दीड दोन वर्षात वर्चस्व नाट्याचा जाहीर तमाशा झालाय!आणि यासाठी पार्श्वसंगीत, वातावरण निर्मितीला खतपाणी घालणारे दलाल वाढलेत!
साधनसूचिता सामाजिक भान,प्रतिमा जपणे या सगळ्याला मूठमाती दिली जातेय!
धोरण ठरवणे, लोकहिताचे निर्णय घेणे लोकांचे हितासाठी सातत्याने काम करणे ही प्रत्येक लोकसेवकाची जबाबदारी!
सरकारच्या चुका दाखवून, दुरूस्त करून घेणे ,मतदात्याचे हितार्थ काम करणे यासाठीच लोकसेवक आपले नेतृत्व करतात!नव्हे ती संधी लोकं तुम्हाला देतात! हे विस्मणात गेलेले आणि पक्षहित,सत्ता यासाठी काहीपण करण्याची मानसिकता वाढलीय!
फार पूर्वी यथा राजा ,तथा प्रजा अशी म्हण होती! ती मागे पडून यथा नेता तथा त्याची टिम असं कच्च गणित घेऊन काम करणारे दिसतात!
यावर लिहिण्यासारखं खूप आहे! अधिवेशनासाठी जो खर्च होतो तो पैसाही लोकांचाच! तिथे लोकांसाठी हिताची कामं होणे आवश्यक आहे!
लोकशाहीचा चौथा स्तंभ आतून पोखरला जातोच आहे पण तो सक्षम रहावा म्हणून आम्हीच निवडून दिलेले लोकसेवक कृती करणेस कचरतात! प्रशासकीय वर्चस्व हेही महत्वपूर्ण कारण आहे!
कृषी, श्रमिक कायद्यावर आरक्षणावर सगळेच हिरीरीने बोलतात! पण चौथास्तंभ धोक्यात आहे ठोस निर्णय घ्या कृती करा म्हटले की एक काळीकुट्ट शांतता पसरते!...कारण यावर बोलण्याने आपल्याला काही फुटेज मिळणार नाही , जे मिळतय तेही बंद होईल म्हणून सच्चा माध्यमकर्मीच्या संपण्याची वाट पाहातात की काय अशी खात्री पटू लागलीय!
ना हे माध्यमांचे मालकांना नियम सांगू शकत,ना विषय मार्गी लावू शकत! कारण सच्चाई ला विचारतो कोण? चौथास्तंभ अत्यावश्यक सेवेतून बाजूला करण्याचे धाडस केले ही कृतीच लोकशाहीला धातक आहे! कोणत्या अधिकाराने ही दडपशाही सुरू आहे? जे माध्यमकर्मी बळी गेलेत,त्यांना न्याय नाही!त्यांचे कुटुंबीयांना मदत करत नाही सरकार! कूणीतरी पुडे येऊन काही रकमेची मदत झोळीत टाकतात, ही अवस्था का यावी ? सर्वसामान्यांना आपत्कालीन स्थितीत, नैसर्गिक आपत्तीत मदत करता मग पत्रकारांनी ,सर्व माध्यमकर्मीनी कुणाचं काय घोडं मारलय?
पण एक निश्चित आहे, परिवर्तन तर होणारच! इथे कोरोनाविरूद्घ लढण्यासह जगण्याचे अनेक प्रश्न आहेत! त्याऐवजी काम करणाऱ्यांना जनहितापेक्षा त्यांचे असतील नसतील ते हिशेब काढून खच्चीकरण चारित्र्यहनन, दडपशाही करण्याचा प्रकार म्हणजे सूडनाट्य सुरू आहे!
है थैमान जेव्हा बहुसंख्य बिनडोक माध्यमांतून रवंथले जाते तेव्हा लोकक्षोभात वाढ होत जातेय! एकमेकांवर चिखलफेक करताना शिंतोडे आपल्यावरही उडतात! नव्हे सध्या तरी सगळीकडे चिखलफेक दिसतोय! काय झाल सुशांत सिंह प्रकरणाच, काय झालं मंत्री राठोडावरच्या आरोपाच ? ..कितीतरी प्रश्न निरूत्तर आहेत!
इतका चिखल झालाय की आमचे प्रश्नही मातीत गाडले जाताहेत!ही एक प्रकारची आमच्या जगण्यावरची भयंकर आणीबाणी आहे! सत्तेत कोण आहे यापेक्षा निवडून आलेले जनसेवक काय व कसे काम करतात हे पाहातोय! जर सच्चा चौथास्तंभ सोईने वापराल नि फेकून द्याल तर हिशेब इथेच द्यावा लागणार आहे,आमचा हक्क, सम्मान देणार नसाल,आम्हाला वाऱ्यावर सोडणार असाल तर लक्षात ठेवा हे वारं वादळात रुप घेऊ शकते! कितीही बंधनं आणा,दुर्लक्ष करा! पण जनता आपल्याला पाहातोय ,हे विसरू नका! सत्ता हे अंतिम सत्य नाही ! आणि कोण किती पाण्यात आहे हे येथील प्रत्येकाला माहित आहे! राजकीय अराजकी कशासाठी? उघडा डोळे, बघा नीट!
कुठे नेऊन ठेवणार आहात आमचा महाराष्ट्र? असा सवाल लोक विचारत आहेत!
विधीमंडळाचे असो की संसदेचे अधिवेशने, ती आमची आहेत! कुणाच्या मनावर व झटक्यावर काम करण्यासाठी नसतात ही! इथे जनहिताची कामे होणे अत्यावश्यक! आमचे हिताचे निर्णय व्हायलाच हवेत-
शीतल करदेकर 7021616645 !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!