राज्यातील पत्रकारांच्या खात्यावर दहा हजार रुपये जमा करावे : सुधिरकुमार ब्राम्हणे
राज्यातील पत्रकारांच्या खात्यावर सरकारने किमान दहा हजार रुपये जमा करावे सुधिरकुमार ब्राम्हणे यांची मागणी
अक्कलकुवा : कोरोना काळात सर्वच घटकातील उद्योगाला सरकार कडून थोडी फार मदत करण्यात आहे मात्र या काळात देशाचा चौथा स्तंभ दुर्लक्षित झाला आहे, पत्रकारांच्या उदरनिर्वाहासाठी सरकारने किमान पाचशे कोटींचे पॅकेज जाहीर करून प्रत्येक पत्रकाराच्या खात्यावर किमान दहा हजार रुपये जमा करावे अशी मागणी महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुधिरकुमार ब्राम्हणे यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे केली आहे.
महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुधिरकुमार ब्राम्हणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील इतर उद्योगाप्रमाणे पत्रकारितेतील व्यवसायांना सुद्धा कोरोना महामारीचा मोठा फटका बसला आहे. छोटी-मोठी वृत्तपत्र बंद पडण्याच्या मार्गावर आहेत तर काही बंद पडली आहेत,त्यामुळे छोट्या-मोठ्या दैनिकांचे पत्रकार संपादक आप आपली प्रतिष्ठा बाजूला ठेवून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी
मिळेल ते काम करुन जीवन पुढे रेटण्याचा प्रयत्न करत आहेत.असे निवेदनात म्हटले आहे आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की,राज्यातील काही पत्रकारांची आर्थिक स्थिती व व्यथा काळजाला पाझर फोडणारी असून, समाजाला दिशा देणारा पत्रकार ,प्रसंगी जीवावर उदार होऊन इतरांच्या न्याय हक्कासाठी लढणारा पत्रकार आज पोटाची खळगी भरण्यासाठी दिशा हीन झाला आहे. म्हणुन कोरोना काळात पत्रकारितेला व पत्रकाराला जीवनदान देण्यासाठी शासनाने त्यांच्यासाठी 500 कोटी चे पॅकेज जाहीर करून प्रत्येक पत्रकाराच्या खात्यावर किमान दहा हजार रुपये जमा करावे अशी मागणी शेवटी निवेदनात करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!