आंदोलनाच्या इशाऱ्यानतंर पाच वर्षापासून थकीत अंगणवाडीचे भाडे वसूल - कॉ. बाबु मेटकर
आंदोलनाच्या इशाऱ्यानतंर पाच वर्षापासून थकीत अंगणवाडीचे भाडे वसूल - कॉ. बाबु मेटकर
कागल:- तालुक्यातील खडकेवाडा येथे भाडेतत्त्वावर घेतलेल्या अंगणवाडीचे पाच वर्षापुर्वीचे महीला व बालकल्याण विभाग पंचायत समिती कागल यांनी थकविलेले अंगणवाडीचे भाडे आंदोलनाच्या इशाऱ्यानतंर देण्यात आले.
पंचायत समितीच्या महिला व बालविकास प्रकल्प विभागाने खडकेवाडा येथील सुकुमार कांबळे यांच्या घरी असलेल्या अंगणवाडीचे ५ वर्षाचे भाडे थकविले आहे, ते तातडीने द्यावे तसेच खडकेवाडा येथील अंगणवाडी मदतनीस यांची सेविका म्हणुन ऑर्डर काढली होती त्यांचा २१ महिण्याचा वाढीव फरक मिळालेला नाही, तोही परीपत्रकाप्रमाणे द्यावा, या प्रमुख मागणीसाठी गेले कित्येक वर्षे लेखी व तोंडी मागणी केली परंतु संबंधित अधिकारी या मागणीकडे दुर्लक्ष करीत होते.
याच मागण्यांसाठी ग्रामपंचायत सदस्य बाबुराव मेटकर व सिटुचे शिवाजी मगदूम हे ही तीन महीने पाठपुरावा करीत परंतु सदर प्रशासन त्यांनाही टोलवाटोलवी करीत होते .
पंचायत समितीच्या सभापती मा. पुनम मगदूम यांनीही संबंधित प्रकल्प अधिकारी यांना थकीत भाडे व अंगणवाडी सेविकेचा वाढीव मोबदला तात्काळ देण्याच्या सुचना दिल्या होत्या तरीही संबंधित विभागाने दुर्लक्ष केले.
म्हणूनच नाईलाजास्तव कोविड सारख्या गंभीर परीस्थितीत फिजिकल डिस्टेंशन ठेवून १ मे २०२१ रोजी सकाळी १२ वाजता मान. पंचायत समिती कार्यालय येथे निदर्शने करण्याचा इशारा खडकेवाडा ग्रामपंचायतीचे नुतन सदस्य बाबुराव मेटकर व सिटुचे शिवाजी मगदूम यांनी संबंधित विभागाला दिला होता.
त्यानंतर तालुका महीला बालकल्याण अधिकारी लांडगे मॅडम यांनी खडकेवाडा ग्रामसेवक सूर्यकांत कुंभार , संबधित घरमालक, ग्रामपंचायत सदस्य बाबुराव मेटकर, पर्यवेक्षिका दळवी मॅडम, यांची दि २९ रोजी संयुक्त मिटींग घेऊन, अंगणवाडीेचे थकीत भाडे तात्काळ ३० एप्रिल रोजी देण्याचे मान्य केले व अंगणवाडी सेविकेचा वाढीव मोबदला १५ मे पर्यंत देण्याचे अश्वासन दिले.
या सर्व प्रक्रियेतमध्ये सभापती पुनम मगदूम, गटविकास अधिकारी संसारे, कागलचे पोलीस निरीक्षक मान. नाळे साहेब, खडकेवाडा ग्रामसेवक सूर्यकांत कुंभार, प्रविण पाटील, के. एन. कोरे यांचे सहकार्य मिळाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!