जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

शेतकरी माईकजीवी,भाषणजीवी आणि जुमलाजीवी नाही हे सुध्दा तेवढेच खरे...

शेतकरी व त्यांना साथ देणारे लोक आंदोलनजीवी आहेत.काही हरकत नाही.मान्य आहे आम्हाला.

परंतु शेतकरी माईकजीवी,भाषणजीवी आणि जुमलाजीवी नाही हे सुध्दा तेवढेच खरे आहे.

स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून आमचे बापजादे आंदोलनजीवी होते. म्हणूनच देशाला स्वातंत्र्य मिळू शकले आणि तुम्ही प्रधानमंत्री होवू शकले हे निर्विवाद सत्य आहे.

आम्हाला आंदोलनजीवी म्हटल्याबद्दल अजिबातही वाईट वाटले नाही.परंतु आम्ही माफीजीवी नाही याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

आम्ही मंदिरजीवी , दक्षिणाजीवी नाही हे स्वाभिमानाने सांगू शकतो.परंतु राममंदिरासाठी अनेक वर्षापासून प्रामाणिकतेने आंदोलन करणारे बिचारे रामभक्त आता स्वतःंला कोणते जीवी म्हणवून घ्यावे या चिंतेने ग्रस्त आहे त्याचे खूप वाईट वाटते.

आणीबाणीच्या काळात काँगेसच्या विरोधात आंदोलन करुन सत्ता मिळविणारे लोक कोणते जीवी होते ?

गांधी,नेहरु,भगतसिंग,सुखदेव यासारख्या असंख्य वीरांनी देश स्वतंत्र करण्यासाठी अनेकदा आंदोलन केले.परंतु ज्यांनी देशाच्या स्वांतंत्र्य आंदोलनात भाग न घेता, आमच्या स्वातंत्र्यविरांचे पत्ते इंग्रजांना दिले त्यांना इंग्रजजीवी म्हणावे काय ?

शेतकऱ्यांच्या मतांवर निवडून येवून सत्तेवर बसणारे व त्यांच्याबद्दलच अपशब्द वापरणारे लोक हेच खरे परजीवी असतात.

अण्णा हजारेंच्या आंदोलनातून जे लोक धूर्तपणे स्वतःंच्या सत्तेची पायाभरणी करतात, तेच खरे परजीवी असतात.

 दुसऱ्यांनी लिहून दिलेले इंग्रजी शब्दांचे fool form (साॕरी full) पोपटासारखे वाचून शेतकरी आंदोलनाची खिल्ली उडविणारे लोकच परजीवी असतात.
त्यामुळे शेतकऱ्यांची टिंगलटवाळी केल्यापेक्षा आपला इतिहास तपासून पहावा.
✍🏻 प्रेमकुमार बोके

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!