नाट्यपरिषद अध्यक्षांविरोधातील अविश्वास नाट्याचा तिसरा अंक लवकरच!
नाट्यपरिषदेत होणार खांदेपालट?
(शीतल करदेकर)
कोरोना काळापासून दाटलेली अ भा म नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाची अविश्वासाची खदखद अखेर नुकत्यात झालेल्या नियामक मंडळ बैठकीत शिक्का मोर्तबकर्ती झाली.
नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी व काही मोजके पदाधिकारी परिषदेचा कारभार मनमानी करुन चालवतात असा आरोप प्रसाद कांबळी अध्यक्ष झाल्यापासून होते आहे.
कोरोना काळात या विषयाला अधिक चालना मिळाली ती ज्या ६०नियामक मंडळातून निवड होऊन प्रसाद कांबळी अध्यक्ष झालेत त्या नियामक मंडळाची बैठक मार्च२०२०नंतर घेतली नाही,की आँनलाईन बैठकीद्वारे संपर्क केला नाही,कोणत्याची विषयाची मंजुरी घेतली नाही! या कारणाने!
१कोटी२०लाखाचे सहायता वाटप नियामक मंडळासमोर विषय न आणता परस्पर कार्यकारिणीने वितरित केली.
२०१८च्या अध्यक्षीय कार्यकालात आपल्या पदाचा दुरुपयोग करुन यशवंतरा़व नाट्यमंदिर रंगमंचाचा गैरवापर केला.
रोजचे दैनंदिन कारभारातही मनमानी सुरु असून त्यामुळे नाट्यपरिषदेचे नुकसान होते आहे.याबाबत वारंवार बैठकीत व पत्राद्वारे नियामक मंडळ सदस्यांनी नाराजी व्यक्त केली होती
कोरोनाकाळातील साहायता वाटपानंतर हा विषय संस्थेच्या विश्वस्तांपर्यत लिखित स्वरुपात गेला.
सदर प्रकाराची मा शरद पवार यांनी गंभीर दखल घेतली असे एकूणच घटनाक्रमावरुन दिसत असताना विश्वस्तांसह बैठकीला केवळ नाट्य परिषद अध्यक्ष प्रसाद कांबळी व कार्यवाह शरद पोंक्षे गेले आणि शरद पवार व शशी प्रभु यांचे सोबत बोलून आले.
नियमानुसार हे अयोग्य असल्याने बहुसंख्य सदस्यांनी आक्षेप घेतला या बैठकिचा ठराव नियामक मंडळ बैठकीत मांडण्यात आल्यावर तो बहुमताने नामंजूर करण्यात आला.
या नियामक मंडळ बैठकीआधी अध्यक्ष प्रसाद कांबळी यांचे विरोधात 33जणांच्या अविश्वास ठरावाचे पत्र देण्यात आले.
त्यानुसार बैठकीनंतरच्या १५दिवसात ७दिवस आधी सूचना देऊन ही विशेष नियामक बैठक लावणे विद्यमान कार्यकारिणीस बंधनकारक आहे.यात अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी बहुमत सिद्ध करणे आवश्यक आहे.
जर अशी बैठक लावली गेली नाही तर नियामक मंडळ पुढील कृती करेल असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
दिवसभर चाललेल्या या नियामक मंडळ बैठकीत जवळपास सर्व ठराव नामंजुर करण्यात आले.
नाट्यपरिषद अध्यक्ष यांचे विरोधातील अविश्वास नाट्य आता अंतिम टप्प्यात आलंय,याचा तिसरा अंक नियामक मंडळाच्या विशेष बैठकीत होईल अशी चर्चा आहे.
जर विद्यमान अध्यक्ष बहुमत सिध्द करु शकले नाहीत तर नवे अध्यक्ष नाट्य परिषदेला मिळतील आणि त्याचबरोबरच इतर कार्यकारिणीसदस्य बदल होऊन खांदेपालट होईल असे जाणकारांचे मत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!