धनंजय मुंडे प्रकरणावर उठलेला वादंग!
मी स्वतः महिला विषयावर काम करतेय लिहितेय अनेक वर्ष!
या प्रकरणी राजकीय महिला कार्यकर्त्यांची मतं,आरोप प्रत्यारोप विषय बाजूला ठेवू!
काही महत्वाचे मुद्दे नमूद करावेसे वाटतात या विषयात !
१) महिला स्वतः रिलेशनमधे होती व आहे
तिने तक्रार केलीय का?
२)दोन मुलं होऊन वडिलांचं नाव वापरताहेत असं वडील म्हणतात!
३)दोन लग्न हे चूकच,काही मोठ्या नेत्यांनी दुस-या लग्नासाठी धर्मबदल केल्याची उदाहरणं आहेत!
४)काही वर्षापुर्वी एक महिला पदाधिकारी, अनेक वर्ष एका पक्षाच्या मोठ्या नेत्याबरोबर रिलेशनशीपमधे होती,पहिली पत्नी सोडतो मग लग्न करतो म्हणून अनेक वर्ष संबंध ठेवले!खरं तर हा विषय खाजगी!पण जेव्हा आपल्याशी दोन मुलाचा बाप असलेला हा नेता लग्न करत नाही म्हटल्यावर पक्षाकडे तक्रार केली,पण पक्षाने दुर्लक्ष केले.
ओरडाआरड झाली,
ताईंनी पक्ष बदल केला.
इथे कोणता न्याय लावणार?
५)अलीकडे खाजगी विषय राजकीय फोडणीचे विषय बनत आहे ,हे वाईट आहे!
६)राजकीय पक्षातही महिला कार्यकर्त्या व सहकारी यांचे कोणत्याही प्रकारे शोषण होऊ नये म्हणून लैगिक अत्याचारविरोधी समिती असायलाच हवी ही आग्रही भूमिका मांडली होती.
(सर्व आस्थापनांप्रमाणे मिडियातही ही समिती असायला हवीच,जेणेकरुन महिलांचे शोषण होणार नाही.)
एकतर पहिली पत्नी असताना किंवा नसताना महिलेने असे संबंध ठेवू नयेत,आणि ठेवल्यावर आपल्याप्रमाणे पुरुषालाही इज्जत असते याचं भान असायलाच हवं!
पहिली बायको आहे हे माहिती असून संबंध ठेवण्याचे खूळ मधल्या काळात का वाढले हा अभ्यासाचा विषय!
असे खाजगी विषय जर काढले गेले तर महारण माजेल!
शीतल करदेकर
पत्रकार व सामाजिक कार्यकर्ती
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!