भारतीय बनावटीचे पहिले इलेक्ट्रिक ट्रॅक्टर बाजारात दाखल
एटीएम न्यूज नेटवर्क : अॅग्री इनोव्हेशनच्या नवीन पर्वाची सुरुवात करत सोनालिकाने टायगर इलेक्ट्रिक नावाच्या भारतातील पहिले फील्ड-रेडी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर अनावरण केले. पारंपारिकपणे वापरल्या जाणार्या डिझेल इंजिन च्या तुलनेत फक्त २५ टक्के रनिंग खर्च सुनिश्चित करण्यासाठी सोनालिका टायगर इलेक्ट्रिक अत्याधुनिक आयपी 67 - 25.5 किलोवॅट नॅचरल कूलिंग कॉम्पॅक्ट बॅटरी आहे. टायगर इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची नाविन्यपूर्ण, उच्च-गुणवत्तेची बॅटरी 10 तासांत नियमित होम चार्जिंग पॉईंटसह पूर्णपणे चार्ज केली जाऊ शकते.
ह्यात चांगल्या कार्यक्षमतेसाठी, उच्च पॉवर डेन्सिटी आणि ताकद आणि आरपीएम ड्रॉप होऊ नये म्हणून उर्जा-कार्यक्षम इलेक्ट्रिक मोटर फिट करण्यात आली आहे. जर्मन डिझाइन मोटार 100% वेळा 100% टॉर्कची उपलब्धता सुनिश्चित करते जे ट्रॅक्टरला कोणत्याही लोड परिस्थितीत जलद उचलण्याची शक्ती देते. ट्रॅक्टर ची बुकिंग सुरु झाली असून कंपनीने प्रारंभिक किंमत 5.99 लाख (एक्स-शोरूम) ठरवली आहे.
सोनालिका समूहाचे कार्यकारी संचालक - रमण मित्तल,यांनी अधिक माहिती देताना सांगितले – “टायगर इलेक्ट्रिक टायगर हे रेगुलर ट्रॅक्टर प्रमाणेच कार्यक्षम असेल आणि शेतकरी बांधवासाठी यूजर फ्रेंडली, पैशाची बचत करवून देणारा असेल. जागतिक स्तरावर जे तंत्रज्ञान वापरले जाते त्याचा ह्यात समावेश आहे. “
ह्यात सोनालिकाचे ट्रान्समिशन सिस्टिम आहे जे आपल्या गुणवत्तेवर खरे उतरले आहे, 24.93 किमी प्रतितासचा वेग प्रदान करतो, आणि 2-टन ट्रॉली खेचण्याचा क्षमतेसह सह 8 तासांचा बॅटरी बॅकअप देते. पर्याय म्हणून, कंपनी फास्ट-चार्जिंग सिस्टम देखील देत आहे जे फक्त चार तासात बॅटरी चार्ज करू शकते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!