शेतकरी आंदोलनाला लीगल राईट जस्टीस प्रोटेक्शन असोसिएशनचा पाठिंबा
शेतकरी आंदोलनाला लीगल राईट जस्टीस प्रोटेक्शन असोसिएशनचा पाठिंबा
अर्जुनी मोरगाव : दिल्ली येथे केंद्र शासनाच्या शेतकरी विधेयकाच्या विरोधात पंजाब हरियाणा येथील शेतकऱ्यांचे महिन्याभरापासून आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांचे न्याय व हक्क अबाधित रहावे म्हणून या आंदोलनाला लीगल राईट जस्टीस प्रोटेक्शन असोसिएशन च्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा दिल्याची माहिती असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक विभागाचे सचिव कृष्णन गोपाल जॉन यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 28 डिसेंबर रोजी स्थानिक मून कॉन्व्हेंट येथे असोसिएशनचे डॉ.के.एस.कंदासामी यांच्या अध्यक्षतेखाली लीगल राईट्स जस्टीस प्रोटेक्शन असोसिएशन ची सभा घेण्यात आली.यावेळी गौरिसंकर शहारे,ऍड.रवी केसलकर,विनायक मडावी उपस्थित होते.सभेमध्ये अल्पसंख्यांक कांच्या विकासासाठी कार्य करणे, दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या या आशयाचे निवेदन यावर चर्चा करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!