विना मास्क 500 रु दंड... रुग्णाला बेड व व्हेंटिलेटर मिळत नाही तर प्रशासनाला किती दंड?
विना मास्क 500 रु दंड... रुग्णाला बेड व व्हेंटिलेटर मिळत नाही तर प्रशासनाला किती दंड?
सोलापूर:- सध्या जिल्ह्यात विना मास्क फिरणार्यांना 500रु चा दंड आकारण्यात येत आहे तर लाॅकडाऊन पासुन ते अनलाॅकडाऊन ते आजपर्यंत फक्त आणि फक्त जनतेची लुट प्रशासन करत आहे. चार महिने लाॅकडाऊन मध्ये गोरगरीब व सर्वसामान्य माणसांची जगु का मरु परिस्थिती अशी झाली आहे. या चार महिन्यात काही धंदा, रोजगार नसताना घरातील वीजबील, घरभाडा, दुकान भाडे, घर खर्च, दवाखाना इत्यादी खर्च होतच आहेत. मिळकत काहीच नसताना देखील सर्वसामान्य जनता व्याजाने, उधारीने तर काही जण सोने घर, जमीन विकुन आपले कुटुंब व शासनाची बिले भरत आहे.
शासनाकडून मोफत पाच किलो गहु, तांदूळ मिळुन देण्यात आला त्यात ही काही लोकांना धान्य मिळाले नाही. गरीब जनतेने शासनाला वीजबील, घरपट्टी यांचे बिले माफ करा म्हणुन साकडे घातले. लोकांना पुर्वी दिवसा 100रु ते 150रु प्रमाणे पगार व 12तास काम करुन महिना 3ते चार हजार कमवायचे आणि आज 200रु दिवसा पगार मिळत असला तरी लोकांना रोज धंदा मिळत नाही आणि महिन्यातून पाच सहा सुट्ट्या पडतात.असे असताना मास्क ऐवजी रुमाल बांधले तरी 500रुपयाचे दंड भरावे लागत आहे आणि विना ओळखपत्र कर्मचारी मोकाट्याने काम करत आहे. आजच्या परिस्थितीत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आज हाॅस्पिटल मध्ये कित्येक गोरगरिबांना बेड व व्हेंटिलेटर मिळत नसल्यामुळे आजपर्यंत कित्येक लोकांना जीव गमवावे लागले आहे. ह्याचे कारण जनता की शासन? लुट फक्त जनतेकडूनच का? आणि हाॅस्पिटल मध्ये बेड व व्हेंटिलेटर मिळत नाही तर प्रशासनाला किती दंड असा प्रश्न सध्या जनते कडुन होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!