पवार साहेब हिंदू विरोधी "राम मंदिर बांधू नका" असे म्हणालेच नाहियेत...
सत्यवचनी राम आणि असत्य वचनी भक्त...
पवार साहेब यांच्या नावावर धादांत खोट पसरवणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवू नका. व्हिडिओ नीट ऐका आणि तुम्हीच ठरवा, पवार साहेब "राम मंदिर बांधू नका" असे अजिबात म्हणाले नाहियेत,तर कोरोना सारख्या महा आपत्ति मधे कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यायच हे राज्यकर्त्यांनी ठरवल पाहिजे असा त्यांच्या बोलण्याचा स्पष्ट अर्थ आहे. यात हिंदू विरोधी किंवा मुस्लीम धार्जिणे काय बोलले पवार साहेब ?
"शरद पवार" या नावाच तहहयात पित्त असलेले मूठभर महाभाग विशेष करून डोंबिवली, पुण्यात आहेत. २०१४ सालात सोशल मिडिया वर पवार किंवा कॉंग्रेस बद्दल खोटनाट पसरवत, लोकांची माथी भडकवत ते सत्ते वर आले. आता तरी त्यांचे "असत्याचे प्रयोग" मोडून काढायला हवेत..
देशभरात कोरोना हाताळण्यात आलेले अपयश, प्रचंड वाढती बेरोजगारी, ठप्प झालेले अर्थचक्र या वरून लोकांचे लक्ष वळविण्यासाठी मंदिर पूजन सारखे इव्हेंट प्राधान्याने करणे हे कदाचित केंद्रिय राज्यकर्त्यां साठी अपरिहार्य असावे.
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "राम मंदिर बांधकामाचं भाजपचं काम कोरोनामुळे बरंच लांबणीवर पडलं होतं. ज्या वेगाने कोरोनाचा फैलाव होतोय तो चिंतेचा विषय आहे. रोज 40 हजारांच्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. मात्र, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 60 ते 64 टक्के असल्याचं आणि मृत्यूदर अत्यंत कमी असल्याचं सरकारकडून सांगितलं जात आहे. हा सगळा लक्ष वळवण्याचा प्रकार आहे. मात्र, ज्या वेगाने आरोग्य सुविधा वाढायला हव्या होत्या तशा कदाचित वाढलेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर मला वाटतं शरद पवार जे बोलले ते बरोबर आहे."
"देशापुढे कोरोनासारखी परिस्थिती असताना मोदी सरकार किंवा भाजप आज जनतेचं लक्ष पुन्हा एकदा भावनिक मुद्द्यांकडे वळवू इच्छिते, असं जनतेला सांगण्याचा शरद पवारांचा उद्देश दिसतो. देशासमोर आज मुख्य समस्या कोरोना विषाणूच्या साथीची आहे, चीनच्या आक्रमणाची आहे आणि कोरोना आणि इतर मुद्द्यांमुळे देशासमोर आर्थिक विपण्णावस्था निर्माण होतेय. या तीन महत्त्वाच्या ज्वलंत समस्या असताना राम मंदिराकडे लक्ष वळवण्याचा भाजपचा जो प्रयत्न चाललेला आहे, त्यावर शरद पवारांनी बोट ठेवलेलं आहे."
तर ही भाजपवर थेट टीका असल्याचं पत्रकार विजय चोरमारे म्हणतात. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "शरद पवारांकडे कुठलंही संवैधानिक पद नाही. मात्र, तरीही 81 वर्षांचे शरद पवार राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दौरा करत आहे. त्यांचं हे वक्तव्य म्हणजे मोदी सरकारवर कारभारावर टीका आहे. कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असताना सरकार लोकांना पुन्हा एकदा हिंदुत्व आणि राम मंदिर या मुद्द्यात अडकवू इच्छिते आणि त्याकडे शरद पवार लक्ष वेधत आहेत."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!