कोल्हापूर येथील पवित्र पावन क्षेत्री नृसिंहवाडी येथे जन्मलेले अमरसिंह शिवाजीराव जगदाळे सरकार हे उच्च अध्यात्मिक शक्ती असणारे उद्योमी व्यावसायिक आहेत. त्यांनी आपली बॅचलर डिग्री "मास कम्युनिकेशन व पत्रकारिता" या विषयांत घेतली आहे तर मास्टर डिग्री "दूरस्थ शिक्षण प्रणाली" या विषयांत घेतली आहे. त्यांनी वयाच्या १६ व्या वर्षापासून आपल्या पत्रकारिता करियरला सुरुवात केली. पत्रकारिता करत असताना त्यांनी अर्धा भारत देशभर प्रवास केला आहे. या प्रवासांत त्यांनी ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांचा जवळून अभ्यास केला आहे. त्यांना ग्रामीण प्रश्नांची जाण आहे. शक्यतो अर्धवट व अपुरे शिक्षण, माहितीचा अभाव, भ्रष्टाचार आणि उदासीनता ही कारणे ग्रामीण विकासातील अडसर असल्याचे त्यांनी जाणले. हे अडसर दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या मित्रांच्या समवेत 30 डिसेंबर 2010 रोजी सम्पूर्ण ग्रामीण भारत देश कार्यक्षेत्र असलेल्या शैक्षणिक संस्थेची "अमर स्वराज्य रुरल डेव्हलपमेंट रिसर्च एंड इन्फर्मेशन इन्स्टिट्यूट" ची स्थापना केली.
या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविले आहेत. राजेंनी साधारणतः 150 हुन अधिक लोकांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत व मार्गदर्शन केले आहे. याची दखल घेऊन मुंबईतील एक शास्त्रज्ञ डॉ सुधीर तारे यांनी ग्लोबल टॅलेंट पूल 2019 साठी युथ आयकॉन म्हणून निवड केली. तसेच फ़िलाटेल ब्युरो, पोस्ट ऑफ इंडियाच्या माय स्टॅम्प श्रेणीतील पोस्टाचे तिकीट प्रकाशित केले. मुंबईत त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. विविध सत्कार अमरसिंह राजे यांचे केले.
शिक्षणाबद्दल अमरसिंह राजे यांना अत्यंत आस्था आहे. सर्वांना शिक्षण मिळावे यासाठी ते सदैव प्रयत्नशील असतात. संस्था काढणे जितके सोपे तितकेच ते नेटाने चालविणे हे देखील अग्निदिव्य आहे. शिक्षणाच्या साठी त्यांनी कुणाकडे देणगी अनुदानाची अपेक्षा न करता स्वतः कर्जे काढून, त्यांनी गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांची पूर्तता केली आहे.
अमरसिंह राजे यांचेवर छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर आद्य साहित्यिक छत्रपती संभाजीराजे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, छत्रपती सयाजीराव गायकवाड, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ बाबासाहेब आंबेडकर, स्व. यशवंतराव चव्हाण, क्रांतिसिंह नाना पाटील, महामहिम डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम साहेब यांच्या विचारांचा पगडा आहे. हे त्यांच्या साध्या राहणी आणि उच्च विचारसरणीच्या जीवन शैलीवरून स्पष्ट होते.
त्यांनी आपली सर्व संपत्ती समाजासाठी खर्ची करण्यात समाधान मानले आहे. समाज माध्यमात उच्च पदस्थ अधिकारी ते आदिवासी वाड्यापाड्यातील साधारण वनवासी पर्यंत त्यांचा मित्रवर्ग पसरला आहे. त्यांचे वैचारिक विवादु व्यक्ती, पक्ष आहेत पण ते अजातशत्रू आहेत.
त्यांनी जगातील 2 नंबरचे ग्रामीण न्यूज नेटवर्क एबीएनएनआय टीव्ही सुरू केलं. आज ABS न्यूज टीव्ही वर ते कार्यरत आहेत.
ग्रामीण भागातील लोकांच्या आर्थिक अज्ञाचा फायदा घेऊन बरेच धनको ग्रामीण लोकांना फसवितात म्हणून त्यांनी श्री आई अंबाबाई फायनान्शियल लेडर ची स्थापना केली आणि त्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण आर्थिक साक्षरता मिशन सुरू ठेवले आहे.
काही लोकांच्या मते ते प्रापंचिक अध्यात्मिक साधू असल्याचे बोलले जाते. त्यांनी अनेक लोकांचे भविष्य कथन केले आहे. ज्याचा अनुभव लोकांना तंतोतंत आला आहे. त्यांच्या बोलण्या नुसार घटना घडल्या असल्याने काहीजण त्यांना आपला आध्यत्मिक गुरू समजतात.
आज राजे बांगलादेशच्या सोशल बिजनेस नेटवर्क, फ्रांस, वर्ल्ड बँक, वर्ल्ड ट्रेंड ऑर्गनायझेशनचे कॉन्ट्रीब्युटर सदस्य आहेत. वर्ल्ड कॉन्स्टयुट्युशन एंड पार्लमेंट असोसिएशनचे ते भारत देशातील प्रतिनिधी आहेत.
वर्ल्ड जर्नालिस्ट रजिस्ट्रेशन कौन्सिल चे संस्थापक अध्यक्ष आहेत.
जगातील बऱ्याच राष्ट्रांत शिक्षणावर खर्च करण्याची मानसिकता व आर्थिक ताकद नसणाऱ्या लोकांना फ्री शिक्षण मिळावे, त्यांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी त्यांनी अमर ई युनिव्हर्सिटी ची स्थापना केली आहे.
- शरद जोशीं©
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!