शेतकरी कुटुंबातील हरीश सुळ यांनी उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली
शेतकरी कुटुंबातील हरीश सुळ यांनी उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली
नातेपुते (श्रीकांत बाविस्कर) : मोरोची (ता माळशिरस, जि. सोलापूर ) येथील एका शेतकरी कुटुंबातील हरीश सुळ यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवित उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली आहे. त्यांच्या निवडीबद्दल गावात जल्लोष करून आनंद व्यक्त करण्यात आला.
हरीशचे प्राथमिक शिक्षण मोरोची गावातच झाले. बारावीचे शिक्षणपुणे जिल्ह्यात झाले असून घरची परिस्थिती बेताचीच आहे. तसेच घरात प्रशासकीय सेवेचा कोणताही वारसा नाही.
सतत अभ्यास व कठोर परिश्रम करण्याची तयारी असल्यामुळे जिद्द व चिकाटीच्या जोरावर देशांमध्ये २२ वा क्रमांक पटकावला . याविषयी बोलताना हरीश सूळ म्हणाले की ,”अपयशाने मी खचून गेलो नाही. स्वतःतील उणिवा शोधल्या, त्यावर मात केली. मागील चुका दुरुस्त केल्या.
राज्यात २२व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो.” महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उपजिल्हाधिकारीपदी निवड झालेल्या हरीश सूळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
बी ई मेकॅनिकलचे अभियांत्रिकी पदवी पिंपरी चिंचवड येथील डी वाय पाटील महाविद्यालयात पूर्ण केले. अभियांत्रिकी पदवी संपादन केल्यानंतर त्यांना एका खाजगी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी लागली पण चांगल्या पगाराची नोकरी सोडून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. राज्यसेवेच्या पाच मुख्य परीक्षा वेळा दिल्या. तीन मुलाखती दिल्या, दरवेळी यशाने थोडक्यात हुलकावणी दिली मात्र, अपयशाने मी खचून गेलो नाही. स्वतःतील उणिवा शोधल्या, त्यावर मात केली. मागील चुका दुरुस्त केल्या. कमी काळ पण जास्त गुणवत्तापुर्ण अभ्यास करण्यावर भर दिला. दररोज ८-१० तास न चुकता अध्ययन केले. मोरोची गावातील पहिले प्रशासकीय अधिकारी हरीश मोहन सुळ यांची उपजिल्हाधिकारी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा व तसेच त्यांचे वडील मोहन सुळ यांचा ग्रामस्थांच्यावतीने जि प सदस्य राहुल उर्फ बापू वाघमोडे पाटील राहुल सुळ, मोराची गावचे सरपंच पिंटू वावरे तसेच उपसरपंच माऊली सुळ प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व दत्तू माने अर्जुन सूळ सचिन सुळ दादा सुळ विठ्ठल सूळ निलेश सुळ यांनी सत्कार केला यावेळी सर्व मोरोची गावचे ग्रामस्थ व सुळ पाटील परिवार उपस्थित होते तसेच माऊली सुळ यांनी छोट्या बंधूंचे जंगी स्वागत केले यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.
हे ही वाचा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!