जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

देवेंद्र फडणवीसांनी चंद्रकांत पाटलांचा शिखंडी केलाय !

देवेंद्र फडणवीसांनी चंद्रकांत पाटलांचा शिखंडी केलाय !

दत्तकुमार खंडागळे 
संपादक वज्रधारी, 
मो.9561551006
    भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे आणि भाजपाचेच माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यातील जुगलबंदीवरून बैल आणि गोचिडाच्या गोष्टीची आठवण आली. बैलाची आणि गर्वाने फुगलेल्या गोचिडीची एक गोष्ट आहे. एक चांगला धष्टपुष्ट बैल असतो. त्याचा मालक त्याला बाजारात विकायला नेतो. बाजारात बैल खरेदी करू इच्छिणारे ग्राहक येतात, बैलाची बोली लावतात. कुणी पन्नास हजार, कुणी साठ हजार रूपयेला मागतात. अखेर बैल सत्तर हजारात विकला जातो. पण गम्मतीचा भाग असा की सदर बैलाच्या अवघड जाग्यावर एक गोचिड चिकटलेली असते. ती तो सगऴा व्यवहार ऐकत असते. तिचा असा समज होत होता की आपलीच बोली लावली जातेय आणि आपल्यालाच सत्तर हजार रूपये इतकी किमंत आलीय. या भ्रमातच ती गोचिड बैलाला हिणवत असते. "बैला, लगा तु इतका मोठा अन मी केवढी पण मला सत्तर हजार रूपये आले. तुझं काय ? तुला कोणी विचारतच नाही !" असे म्हणत बैलावर तोंडसुख घेत असते. पण त्या गोचिडाला हे ठाऊक नसते की आपण जी आपली किमंत सांगतोय ती स्वत:ची नसून त्या बैलाचीच आहे. ग्राहकाने बैलालाच खरेदी केलेले आहे आपल्याला नाही. आपण बैलाच्या अवघड जाग्याला चिकटलोय आणि बैलामुळेच आपले अस्तित्व आहे याची आठवण तिला नसते. ती या भ्रमातच असते की आपणच मौल्यवान आहोत. आपल्यालाच ग्राहकाने सत्तर हजार देवून विकत घेतले आहे. या भ्रामक मस्तीत ती स्वत:ची औकाद विसरलेली असते. अगदी हेच एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्या वादात घडले आहे. 

          एकनाथ खडसे है बैल आहेत आणि चंद्रकांत पाटील हे सत्तेच्या अवघड जाग्यावर चिकडलेली गोचिड आहेत. त्यांना संघाच्या वरदहस्ताने मंत्रीपद मिळाले होते. फडणवीसांची हुजरेगिरी करून त्यांनी आपली खुर्ची कायम ठेवली हेच त्यांचे योगदान. या शिवाय नावापुढे पाटील आहे ही जमेची बाजू. पण त्यांच्या नावापुढे पाटील असणे हे योगदानही त्यांचे  नाही ते त्यांच्या म्हातार्याचे. बाकी त्यांचे कर्तृत्व काय ? भाजपासाठी, कोल्हापुर जिल्ह्यासाठी त्यांचे योगदान काय ? हा संशोधनाचा विषय आहे.  सत्तेच्या वळचणीला राहून त्यांना स्वत:च्या औकादीचे भान राहिलेले दिसत नाही. ते गोचिडासारखे भ्रमात आहेत. बैलाला आलेली किंमत त्यांना स्वतची किमंत वाटू लागली आहे. संघाच्या वरदहस्ताने मिळालेले मंत्रीपद आणि फडणवीसांच्या मेहरबानीने मिळालेली भाजपातली स्पेस हि त्यांना आपली स्वत:चीच कर्तबगारी वाटते आहे. त्या मस्तीतच ते कुणावरही तोंड टाकत आहेत. शरद पवारापासून ते एकनाथ खडसे अशा अनेकांच्यावर ते घसरत आहेत. मागे ते बारामतीत शरद पवारांना पाडायला जाणार होते. बारामतीत उभे राहणार होते पण ऐनवेळी फुशारकी विसरून पुण्यात पळ काढला. कोल्हापुरात निवडूण येणार नाही याची खात्री असल्याने त्यांनी पुणे गाठले. तिथे कुलकर्णी मँडमच्या जाग्यावर कब्जा केला. तिथेही टाचा घासून विजय मिळवला. खरेतर त्यांची कुवत किती आणि ते बोलतात किती ? याचा त्यांनी स्वत:च तारतम्याने विचार करायला हवा. बेडकी फुगली म्हणून तिचा बैल होत नाही किंवा बैलाच्या अवघड जाग्याला चिकटली म्हणून कोणी गोचिड विकत घेत नाही. पण सत्तेचा वारा नाका-तोंडात गेलेल्या चंद्रकांत पाटलांना सांगायचे कुणी ? हा खरा प्रश्न आहे. ते स्वत:ला बैलापेक्षा बलाढ्य समजू लागलेत. पण आपलं अस्तित्वच बैलाच्याच जीवावर अवलंबून आहे याचे भान त्यांना असायला हवे.

चंद्रकांत पाटील आज ज्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्या भाजपाला  गोपिनाथ मुंडे, एकनाथ खडसे, अण्णा डांगे अशा बहूजनातील लोकांनी वाढवले आहे. जो पक्ष भटा-बामणांचा आणि शेटजी-भटजींचा म्हणून ओळखला जात होता तो पक्ष महाराष्ट्रभर जन-माणसात रूजवण्याचे काम या लोकांनी केले. त्यांनी पक्षाला स्वत:चे आयुष्य समर्पित केले. पक्ष कार्यासाठी स्वत:ला गाडून घेतले. खडसे सारख्या नेत्याला भाजपाने पदं देवून मेहरबानी केलेली नाही. तो त्यांचा अधिकार आणि हक्कच होता. खडसे, मुंडे या लोकांनी भाजपाला आयुष्य दिलय. या लोकांनी पक्षासाठी आयुष्य वेचलय, तेव्हा कोठे भाजपा सत्तेपर्यंत पोहोचू शकली. महाराष्ट्रात भाजपाचा निवडणूक चिन्हाचा बिल्ला कुणी हातातही घेत नव्हते तोच बिल्ला घरा-घरात पोहोचवण्याचे काम या लोकांनी केले आहे. भाजपाने ही बहूजनांच्यातली माणसं एका विशिष्ट उंचीवरच अडवली. त्याच्यावर वाढताना त्यांचे पाय छाटले. जे गोपिनाथ मुंडेंच्या बाबतीत झाले तेच आज एकनाथ खडसेंच्या बाबतीत होतय. तेच विनोद तावडेंच्या बाबतीत होतय. पण हा प्रकार गडकरी, फडणवीस, गिरीष महाजन, बापट यांच्या बाबतीत होत नाही. चंद्रकांत पाटलांना स्वत:च्या जिल्ह्यात पक्ष वाढवता आलेला नाही.खडसे परवा जे बोलले ते खरे आहे. चंद्रकांत पाटील जेव्हा चड्डीत मुतत असतील तेव्हा खडसे जन-माणसात पक्ष पेरत होते. या लोकांच्या योगदानामुळेच भाजपा वाढू शकला आणि चंद्रकांत पाटील त्या पक्षाचे मंत्री व प्रदेशाध्यक्ष होवू शकले. पक्षासाठी स्वत:चे आयुष्य समर्पित करणार्या खडसे सारख्या माणसावर तोंड सोडताना याचे भान चंद्रकांत पाटलांनी ठेवावे. कालच्या विधानसभेला कोल्हापुर जिल्ह्यात साधा एक तरी आमदार त्यांना निवडूण आणता आला का ? अशा माणसाने एकनाथ खडसे सारख्या माणसावर तोंड टाकावे आणि हिणवावे याचे वाईट वाटते. एकनाथ खडसे, शरद पवार यांच्यावर तोंड सोडण्याची चंद्रकांत पाटलांची क्षमता नाही. एकवेळ शरद पवार विरोधक आहेत. विरोधकांवर टिका केलेली मान्य. पण ज्यांनी पक्षच उभा केला, ज्यांच्या जीवावर सत्ता भोगली त्या लोकांचीच लक्तरे काढत असतील तर वाईट आहे. एकनाथ खडसेंची सरपंच ते राज्याचा मंत्री अशी दिमाखदार कारकिर्द उगाच नाही घडली. एकनाथ खडसेंनी भाजपासाठी घाम गाळलाय, कष्ट केलेत. बापाने राब-राब राबून संपत्ती कमवावी आणि त्यालाच आयतखावू पोराने व्यवहार शिकवावा अशातला हा प्रकार आहे. खरेतर देवेंद्र फडणवीसांनी चंद्रकांत पाटलांचा शिखंडी केलाय. ते शिखंडीला पुढे करून भिष्मावर बाण चालवणार्या अर्जूनासारखे वागत आहेत. भीष्माला मारायला शिखंडीचा उपयोग करत आहेत. शिखंडीच्याआडून बाण चालवत आहेत. खरेतर चंद्रकांत पाटलांच्या आडून तेच खडसेंचा गेम करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!