जितेंद्र आव्हाड या माणसाचं बोलणं नेहमी ओव्हरएक्टिंग वाटत आलं आहे. त्यांची बाॅडिलॅग्वेज कुठच अपील होत नाही. सारखं भावनिक बोलणं किंवा टोकाचा द्वेष दाखवण्यामुळं हा माणूस मला पर्सनली कधीच नेता म्हणून आवडला नाही.
पण काल रात्री एक किस्सा झाला. आरतीच्या एका मैत्रिणींचे वडील गेली चार पाच दिवस आजारी होते. त्यांना ठाण्यातील एका नाॅन कोव्हिड हाॅस्पीटलमध्ये ॲडमीट करण्यात आलं होतं. काल सकाळी त्यांची कोरोना टेस्ट पाॅझीटिव्ह आली. हाॅस्पीटलने संबंधित पेशंटला कोव्हिड हाॅस्पीटलमध्ये हलवण्याची सूचना केली.
या व्यक्तीला दोन मुलीच आहेच. मुंबईत कोव्हिड हाॅस्पीटल शोधण्यात या मुलीचा दिवस गेला. रात्र झाली तशी पोरगी हतबल. वडिल व्हेंटिलेटरवर होते. आरतीने ही गोष्ट सांगितली तेव्हा अकरा वाजून गेले होते. दोन चार तासात पेशंट कोव्हिड हाॅस्पीटलमध्ये पोहचायला पाहीजेच होता.
आत्ता ठाण्यात आपल्या कोण ओळखीचं असण्याची शक्यता कमी. आरतीला सांगितलं एक ट्विट कर. मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांना टॅग कर. आरतीने ट्विट केलं.
या दरम्यान मी दोन फोन केले. पहिला फोन मराठी रिट्विटच्या स्वप्नीलला करून ट्विट संबधितापर्यन्त पोहचण्याची सोय केली आणि दूसरा फोन मोहसीन शेखला केला. ठाण्यात जितेंद्र आव्हाड ही सोय करतील अस वाटत होतं.
मोहसीनचा दोनच मिनिटात फोन आला. आव्हाड साहेबांच्या कानावर ही गोष्ट गेली आहे. त्यांना फोन गेले होते ते कोव्हिड हाॅस्पीटल शोधत आहेत म्हणून सांगितलं. दूसऱ्या तिसऱ्या मिनटात जितेंद्र आव्हाडांचा आरतीला फोन आला. मला पाच दहा मिनीट द्या. म्हणून सांगण्यात आलं.
या दरम्यान ट्विट व्हायरल झालं. शिवसेना अतिदक्षता विभाग, मनसेचे अविनाश जाधव, जयंत पाटील यांचे ॲाफिस, धनंजय मुंडे यांचे ॲाफिस व इतर पदाधिकारी यांचे फोन आले. ते देखील माहिती घेवून मदत करू लागले.
ठरल्याप्रमाणे पुढच्या दहा मिनटात पुन्हा जितेंद्र आव्हाडांचा फोन आला. सुप्रिया सुळे यांनी देखील फोन करून आव्हाडांकडून माहिती घेतली होती. काही वेळात वेदांत हाॅस्पीटलमध्ये पेशंट घेवून जाण्यात आला. त्यासाठी ॲम्ब्युलन्स देखील मुंब्र्याहून आव्हाडांनी पाठवली .
एका झटक्यात आव्हाडांनी प्रश्न मार्गी लावला. शिवसेना, मनसे या गोष्टीत मदत करत होते. विशेष म्हणजे परंपरेनुसार या काळात एकाही भाजपच्या एकाही नेत्याने काहीही केले नाही.
सोशल मिडीया एखाद्या नेत्याची चुकीची इमेज सेट करतो. आव्हाड देखील आपल्या बोलण्याच्या स्टाईलमुळे यांचे बळी ठरलेतच. पण कामाच्या बाबतीत हा माणूस प्रचंड बाप आहे हे नक्की.
Sourabh Patil
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!