९९₹ वर्षभर अंक देऊन इतर दैनिकांना संपविण्याचा विडा उचललेल्या 'महाराष्ट्र टाईम्सचा' अंक बंद
अवघ्या ९९₹ त वर्षभर अंक तरीही गाशा गुंडाळावा लागला महाराष्ट्र टाइम्सला
कोल्हापूर : अवघ्या ९९₹ त वर्षभर अंक पुरवठा करणाऱ्या "महाराष्ट्र टाईम्स" या दैनिकाने कोल्हापूर जिल्ह्यातून स्वतःचा गाशा गुंडाळावा लागला आहे. ३१ मे पासून कोल्हापूर आवृत्ती बंद होणार असून सोबत जळगांव आणि नगर आवृत्ती ही १३ मे पासून बंद होणार आहे, त्यामुळे ८० कर्मचारी बेकारी ला सामोरे जाणार आहेत.सन २०११-१२ मध्ये मार्केटमध्ये स्वतःची मोनोपॉली निर्माण करण्यासाठी टाईम्स ग्रुप्सच्या मराठी "महाराष्ट्र टाईम्सचा" शिरकाव कोल्हापूर मध्ये मोठ्या थाटामाटात झाला. अवघ्या ९९₹ वर्षभर अंक ह्या रद्दीच्या दरात वार्षिक अंक विक्री केली. भांडवलाच्या जीवावर ही गगनभेदी गर्जना केली. कोल्हापूर च्या जनतेला ही वाटलं की आता जाधवांचा दैनिक पुढारी आणि दरडाचा लोकमत वृत्तपत्राच्या बाजारातून बाहेर फेकले जातील. पण लोकशाही वर विश्वास ठेवणाऱ्या आणि सच्या पत्रकारिता करणाऱ्या कोल्हापूरच्या जनतेने जाहिरातीच्या बाबतीत मटाला वंचितच ठेवले.
त्यामुळे अगोदरच अनावश्यक खर्च त्यात लॉकडाऊन यामुळे मटा च्या व्यवस्थापणाने ही आवृत्ती बंद करण्याचा व्यापारी निर्णय घेतला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!