जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

मोदिभक्तीच्या "सनातन धर्मामुळे" आखातातील नोकरदार जेलमध्ये

भक्तांनो , जुलाबाच्या गोळ्यांचा साठा करुन ठेवा बरे आता :-
अनिवासी भारतीयांवर सुलतानी संकट 
-ज्ञानेश महाराव, संपादक, सा. चित्रलेखा


दिव्य दृष्टीच्या नरेंद्र मोदी यांना ‘हा आजार भारतात येणारच नाही,’ याची खात्री २० मार्चपर्यंत होती आणि त्यांनी २२ मार्चला देशव्यापी ‘लॉकडाऊन’ जारी केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फेब्रुवारी महिन्यात भारतात येऊन गेले. ते अमेरिकेत परतेपर्यंत त्यांच्यासाठी ‘Covid-19’ हा फक्त आणि फक्त ‘चायनीज व्हायरस’ होता. त्यांनी या आजारावर “कीटकनाशक टोचून काही इलाज करता येतो का?” किंवा ‘”कोरोना’बाधित व्यक्तीला कीटकनाशक पाजून हा विषाणू आतल्या आत मारता येईल का?” याची शक्यता आजमावण्याचा सल्ला त्यांचे वैद्यकीय सल्लागार डेबोरा बर्क्स यांना दिला होता. ब्राझीलचे अध्यक्ष बोत्सेनारो यांनी तर राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात, ‘कोरोना’ची संभावना ‘एक साधारण ताप-थंडी’ अशी केली. 

*आज अमेरिका जात्यातून भरडून बाहेर पडत आहे. तर भारत सुपात आहे.* आणखी काही महिने आपल्याला या संकटाला सामोरे जायचे आहे. पण संकटाचे परिणाम भारताला कुठे नेऊन ठेवणार; याची झलक अमेरिका आणि भारताचे नेतृत्व व त्यांचे भक्त दाखवित आहेत. ‘कोरोना’च्या परिणाम स्वरूप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष नुकतेच म्हणाले, ”एका अदृश्य शत्रूच्या हल्ल्याच्या कारणामुळे आणि अमेरिकेच्या नागरिकांच्या हिताचा विचार करून, मी एका महत्त्वाच्या प्रस्तावावर लवकरच सही करणार आहे. हा प्रस्ताव ‘इमिग्रेशन’ या विषयाशी संबंधित आहे किंवा असेल. या प्रस्तावानुसार, ‘इमिग्रेशन’ अनिश्चित काळासाठी स्थगित केले जाऊ शकते.” डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला हा विचार एका ‘ट्विट’द्वारे व्यक्त करताच ‘सिलिकॉन व्हॅली’तल्या ‘चिन्मय-तन्मय’च्या पोटात भीतीचा गोळा आलाय. ते अधिक चिंताग्रस्त झाले तर, त्यांचे पार्ले-पुण्यातले आई-बाबा पण हातपाय गाळतील. अशी हवा असतानाच ट्रम्प यांनी आपल्या अधिकारात अन्य देशांतून अमेरिकेत येणाऱ्या प्रवासी, नोकरदारांना तात्पुरती का होईना बंदी घातली सुद्धा ! 

ट्रम्प हे त्यांच्या देशातील नागरिकांच्या हिताच्या या प्रस्तावावर सही करत असताना आणि त्याचा भारतावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असताना; आपल्या देशातील भक्त मंडळी सुद्धा उर्वरित देशातील अनिवासी भारतीयांच्या गळ्याला फास लावण्यात प्रयत्नांची कोणतीही कसर सोडत नव्हते. दिल्लीत ‘तबलीगीं’नी आयोजित केलेला कार्यक्रम आणि त्या कारणामुळे कमी-अधिक प्रमाणात झालेला ‘कोरोना’चा प्रसार आणि त्यासंबंधातील प्रचार सर्वज्ञात आहे. तोपर्यंत धर्म-जातविहीन असणारा ‘कोरोना’ मरकज- तबलीगींमुळे ‘इस्लामी’ झाला.‌ काहींच्या ‘फेक न्यूज’मुळे तो ‘जिहादी’ही झाला. त्या प्रकरणापासून सुरू झालेला प्रचार ‘मुसलमान दुकानदारांकडून काहीही माल खरेदी करू नका,’ इथपर्यंत पोहोचला. ‘कोरोना’च्या निमित्ताने काही संस्था-संघटनांना आपला मुस्लीमद्वेष टोकाच्या पातळीवर पुढे न्यायचा होता. भारतातल्या अत्यंत जातीयवादी विचारसरणीच्या लोकांचा हा ‘अजेंडा’ पाहता पाहता अनिवासी भारतीयांच्या अभिव्यक्तीचा विषय बनला‌. 

सौरभ उपाध्याय याचा अमिरातीत मोठा व्यवसाय आहे. त्याचे सर्वस्व अरब देशात‌ आणि अरब देशांवर अवलंबून आहे. त्याने तिथे बसून आपल्या ‘ट्विटर अकाउंट’च्या उंटावरून भारतातल्या शेळ्या हाकायला सुरुवात केली. त्याचे म्हणणे असे की, ‘कुणी हिंदू कुठल्याही आश्रमाचे समर्थन करत नाहीत. तेव्हा तुम्ही मुस्लिमांनीही तबलीगींचा कैवार घेऊ नका. काय उखडायचे ते उखडा.’ अशी ‘टीव-टीव’ करणारा सौरभ काही एकटाच नाही. आखाती देशातील अनेक भक्त ‘सोशल मीडिया’वर सुसाट सुटले होते. त्यांच्या या आगलाव्या उचापतींवर सौदीच्या राजकुमारीने जोरदार आक्षेप घेत, ‘तुमच्यासारखे लोक विद्वेष वाढवीत आहेत. तुम्ही शिक्षेच्या वाटेवरून या देशाच्या बाहेर जाण्याच्या अवस्थेपर्यंत आला आहात,’ असे सुनावले. त्याच वेळी इतर आखाती देशांतील जबाबदार व्यक्तींनी वेगवेगळ्या संदर्भात प्रधानमंत्री मोदी यांना ‘ट्वीट-रिट्वीट’ केले. त्यानंतर मोदीजी जागे झाले आणि त्यांनी एक ‘धर्मनिरपेक्ष ट्वीट’ केले. त्यात त्यांनी भक्तांना सांगितले, ”कोरोना’ला जाती विशेष आणि धर्मसापेक्ष करू नका.’ पण तोपर्यंत वातावरण जास्तच तापले गेले होते. 

इक्बाल नावाच्या एका कार्यकर्त्याने ‘भारतीय जनता पक्ष’चे बेंगळुरू येथील खासदार तेजस्वी सूर्या यांचे एक ‘ट्वीट रिट्वीट’ केले. त्यातून भारतातले लोक प्रतिनिधिक स्वरूपात सौदी वा इतर आखाती देशांतील लोकांबद्दल काय विचार करतात, ते त्याने ‘एक्सपोज’ केले. तारीक फतेह या कॅनडावासी पत्रकाराच्या सौदीमधील लोकशाहीबाबतच्या विचारांवर प्रतिक्रिया देताना खासदार सूर्या यांनी लिहिले की, ‘अरब देशातील महिलांनी शेकडो वर्षांत समागमाच्या दरम्यान कामतृप्तीचा अनुभवच घेतलेला नसेल. अशा महिलांची संख्या ९५ टक्क्यांच्या आसपास असावी. ज्या बायांना मुले झाली असतील, जी केवळ शारीरिक संबंधातून‌, प्रेमळ सहवासातून नक्कीच नाही.’ हे सूर्या यांचे ‘ट्वीट’ २०१५ मधील आहे‌. पण आताच्या संदर्भात उपयुक्त म्हणून इक्बाल यांनी ते उकरून काढले. त्यामुळे आखाती देशातील बहुतेक भक्तमंडळी तिथल्या पोलिसांच्या ‘रडार’वर आली आहेत. ज्या मध्यपूर्व देशातून नोकरी – व्यवसायाच्या कारणाने मोठे उत्पन्न मिळते, त्याच देशाच्या संवेदनांना ओरखडण्याचे काम तिथे होत असेल, तर गप्प कोण बसेल ? भारतात गेली ६ वर्षे कुणी उदारमतवादी हिंदू किंवा विवेकवादी अल्पसंख्य ‘मोदी सरकार’च्या विरोधात काही बोलला, तर ‘जा तिकडे पाकिस्तानला,’ असे बोलणे सहज- सोपे झाले आहे. आता कट्टरतावादाला, त्याचे प्रतीक बनलेल्या सौरभ उपाध्यायला दुबईतला आपला धंदा-पाणी बंद करण्याची वेळ आली आहे. त्याचे ‘ट्विटर व फेसबुक’ बंद आहेच. पण शिक्षा भोगून, ( तिथे असला आचरटपणा गुन्हा आहे ) नादार होऊन त्याला भारतात परतावे लागल्यास त्याला पक्ष प्रेम आणि मोदीभक्ती भलतीच महाग पडली म्हणायची! 

सौदीच्या राजकुमारी प्रिन्सेस हेल अल कासिमी यांनी, भारतीय व जागतिक स्तरावरील ‘इस्लामोफोबिया’ विरुद्ध भूमिका घेतल्याने आखाती देशात एक जबरदस्त असा दबावच तयार झालाय. हेल अल कासिमी आग्रहाने बोलतात, ‘माझ्या देशाच्या भूमीतून मी विद्वेष आणि हिंसा यांचा आधार असणाऱ्या विचारांचा प्रतिकार करणार!’ यासाठी त्या महात्मा गांधी, अब्दुल कलाम यांची विधानं अवतरणात देत आहेत. आखाती देशांतील पोलीस तिथल्या भक्तांचा शोध घेत आहेत. आपल्या राजदूतांना तिथली सरकार सतर्क करत आहेत. लाखो ‘अनिवासी भारतीय’ प्रथमच भक्तांच्या या कर्तृत्वामुळे जातीयवादी, विद्वेषी असल्याचे मानले जाऊ लागलेत. 

भारतात परदेशातून १०० डॉलर येत असतील,‌ तर त्यापैकी ५३ डॉलर्स हे आखाती देशांमधील अनिवासी भारतीयांकडून येतात. ‌जगभरातील ४८ देशांत दोन कोटी ‘अनिवासी भारतीय’ नोकरी-धंदा करतात. आपला ‘मूळ भारतीय’ वंशाचा माणूस आयर्लंड, मॉरिशस, फिजी या देशांत सर्वोच्च पदांपर्यंत पोहोचलाय. अनेक मोठ्या देशांत ‘अनिवासी भारतीय’ जबाबदारीच्या पदांचा भार वाहतात. तथापि, केंद्र सत्ता मिळवण्यासाठी भारतात जे विद्वेषाचे विष सात वर्षांपूर्वी पेरले, ते आता जगभरात उगवलेले दिसते . चार महिन्यांपूर्वी ‘मोदी सरकार’ने CRA,NRC आणि NPRच्या माध्यमातून जी भूमिका घेतली, तीच आता वेगळ्या स्वरूपात जगभर भारतीयांबद्दल घेतली जाईल, अशी परिस्थिती आहे. अमेरिकेत ‘H-1b व्हिसा’मध्ये काम करणाऱ्यांना आता ६० दिवसांचा ‘ले ऑफ’ दिला आहे. सध्याचे संकट जर आणखी गडद झाले तर, अमेरिकी अर्थव्यवस्था वाचावी आणि तिथल्या लोकांना रोजगार मिळावा यासाठी ‘इमिग्रेशन’ कायद्यात बदल होण्याची शक्यता निर्माण झालीय. तेव्हा ‘चिन्मय- तन्मय’वर पुन्हा पार्ले – पुण्याला परतायची वेळ येऊ शकते. भक्तमंडळी नाझीवादाच्या वाटेवरून परत फिरले नाही, तर आखाती देश आपल्या मुसक्या आवळू शकतात. ’इस्लाम’ची स्थापना होण्यापूर्वीपासून हिन्दुस्थानचे अरब आणि आखाती देशांशी संबंध आहेत. ते अलीकडेच नामकरण झालेला ‘सनातन धर्म’वाद्यांच्या अतिरेकी राष्ट्रवादामुळे बिघडल्यास भारत आर्थिक खाईत अडकू शकतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!