कागल (प्रतिनिधी): बस्तवडे ग्रामपंचायतच्या वतीने गावातील चावी धारकांना पावसाच्या पाण्यामुळे व पुरामुळे गढूळ पाणी येत होते. त्यावर उपाय म्हणून गावातील काही नागरिक, व सामाजिक कार्यकर्ते यांनी सर्वांना मेडिक्लोर औषध वाटप करावे. अशा सूचना आल्या होत्या त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायत सन्माननीय सदस्य, व ग्रामसेवक प्रशासन यांनी गावातील चावी धारकांना पंधरावा वित्त आयोगातून मेडिक्लोर देण्याचे ठरले व आज ते मेडीक्लोर वाटप केले.
गावातील चावी धारकांनी ग्रामपंचायत कार्यालयात येऊन मेडीक्लोर घेऊन जावावे अशी नम्र विनंती ग्रामपंचायतीने केली आहे
आज सायंकाळी साडेसात नंतर राहिलेल्या चावी धारकांना पुन्हा मेडीक्लोर वाटप करण्यात येणार आहे.
सदरचे मेडिकलवर औषध एक घागरीमध्ये एक थेंब टाकावे. असे आवाहन बस्तवडे ग्रामपचायतीं कडून करण्यात आले आहे.
यावेळी सरपंच सौ कांबळे, माजी सरपंच सौ शिंदे, ग्रामसेविका चौगुले मॅडम, सामाजिक कार्यकर्ते साताप्पा कांबळे, अशोक जगदाळे, संपादक अमरसिंह राजे, विष्णू वांगळे, ए.पी.पाटील सर, राजकुमार कानडे पाटील, दत्तात्रय पाटील, रामचंद्र पाटील, जयवंत इंगळे, एकनाथ चिखलकर, कृष्णात जगदाळे, गिर्गावे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!