मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी ओबीसी बांधवांची साथ... योगेश केदार
#मराठा_वनवास_यात्रा अन् आपल्या भूमिकेवर मराठ्यांपेक्षा ओबीसी समाज जास्त लक्ष ठेऊन आहे.....रात्री नांदेड वरून निघायला उशीर झाला होता. पुण्याच्या दिशेने प्रवास सुरू होता. सलग अनेक दिवसांपासून मी सतत बोलत आहे. संविधान समजाऊन सांगत आहे. दिवसात अनेकवेळा भाषणे करावी लागत आहेत. त्यातून पाणी देखील बदलले होते. त्यामुळे असेल कदाचित माझा घसा खूपच दुखत होता. बार्शी चे डॉ प्रशांत मांजरे सरांना मी एक दिवस आधी त्यावर गोळ्या घेऊ असे म्हटलो होतो. पण वेळेअभावी गोळ्या घेणे राहून गेले. मला एखादा शब्द बोलणेही नको वाटत होते. तरी दोन दिवस अनेक गावांत भाषणे केली. कळंब, अंबाजोगाई, अहमदपूर, लोहा , नांदेड येथे बांधवांना ओबीसी आरक्षण समजाऊन सांगितले.
नांदेड वरून निघालो होतो अन् रात्री 9 च्या सुमारास परत लोहा येथे एका मेडिकल मध्ये औषध घेण्यासाठी थांबलो. डॉक्टर साहेबांनी ज्या गोळ्या विचारल्या त्या त्यांच्याकडे नव्हत्या. पण त्या मेडिकल वाल्या बांधवाने स्त्रेप्सिल च्या गोळ्या फुकट देऊन टाकल्या. माझ्या अंगावरचा वनवासाचा ड्रेस बघून त्यांनी आदर व्यक्त केला. मराठा समाजासाठी तुम्ही एवढे करत आहात, त्यापुढे हे काहीच नाही. अशी भावना व्यक्त केली.
तिथून माघारी निघालो, तर एका बांधवाने अडवले. अन् म्हणाले तुम्ही योगेश केदार दादा ना? मी हो म्हणालो. दादा या ना चहा तरी घ्या. तुम्हाला आम्ही खूप फॉलो करतो. तुमचे लेख नेहमी वाचतो. सगळ्या गवखेड्यात चर्चा सुरू आहे. या ना. मग आम्ही गेलो. लगेच दहा वीस लोकं जमली. तिथे आम्ही वनवास यात्रेच्या उद्देशाविषयी बोलत होतो. ज्या हॉटेल मध्ये बसलो होतो ते हॉटेल चे मालक म्हणाले आमचे धपाटे प्रसिद्ध आहेत. जरा खाता का? जेवणाची वेळ असल्याने मी होकार दिला. माझा स्वार्थ हा जेवणापेक्षा लोकांना आरक्षण समजावून सांगणे जास्त असतो. मी जेवणाची तयारी दर्शवली. अन् विस्ताराने आरक्षण समजावून सांगितले.
सांगायचा मुद्दा असा की, ज्या तरुणाने थांबवले तो राठोड आडनावाचा होता. ज्या हॉटेल मध्ये जेवलो, ते ओबीसी बांधवाचे होते. तिथे काही मराठा बांधव होते, पण बहुतांश ओबीसी बांधव होते. हे मला कळले जेंव्हा आम्ही उठून पुढच्या प्रवासासाठी निघालो. अन् परिचय करून दिला. समोर बसलेली माणसे कोणत्या समाजाची आहेत हे माहिती नसतानाही त्या सर्वांना ओबीसी मधूनच मराठा समाजाला ओबीसी आरक्षण ही भूमिका समजाऊन सांगितली. हे करत असताना एकही ओबीसी बांधवाला वाईट वाटले नाही. उलट सर्वांनी आपल्या भूमिकेला समर्थन दिले. जेवण देखील फुकट दिले.
वरील किस्सा सर्व राजकारण्यांनी जरूर वाचवा. विशेषतः स्वतःला ओबीसी नेते म्हणवणाऱ्या राजकारण्यांनी तर लक्षपूर्वक वाचावा....
द्वारा योगेश केदार यांनी दिलेल्या माहितीनुसार
मराठा वनवास यात्रा
9823620666
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!