लाॅकडाऊन विरोधात दुधनी नगरपालिकेत व्यापार्यांचा मोर्चा
लाॅकडाऊन विरोधात दुधनी नगरपालिकेत व्यापार्यांचा मोर्चा
दुधनी:- कोररोनाचा तिसरा टप्पा महाराष्ट्रात झपाट्याने वाढत असुन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रात कडक निर्बंध व शनिवार व रविवार पुर्ण लाॅकडाऊन म्हणून आदेश काढले होते पण काल रात्री पासुन सर्व दुकाने बंद फक्त जीवनावश्यक वस्तू व दुकाने चालू बाकी सर्व दुकाने बंद करण्यात आला आहे, पण दुधनी गावातील व्यापार्यांचा म्हणणे आहे की आम्ही सर्व व्यापारी व नोकरदार कोरोना रॅपीड टेस्ट करून आलो आहे एक कोरोना पॉझिटीव्ह निघाला नाही तर आम्ही दुकान का बंद करायचे, बंद करायचे झाले तर दुधनी नगरपालिका, पोलिस स्टेशन, किराणा दुकान, इ.सर्व बंद करा व आम्हाला खाण्या पिण्याची व्यवस्था करा म्हणून दुधनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आतिष वाळुंजे यांना सर्व व्यापारी वर्ग मिळुन निवेदन दिले.
मुख्याधिकारी आतिष वाळुंजे यांनी व्यापारी वर्गाला विश्वासात घेऊन म्हणाले की मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार मी कारवाई केला आहे तरी दुधनी मधील परिस्थितीचा विचार करुन जिल्हाधिकारी यांचे कडे मी निवेदन पाठवतो व तुम्हाला योग्य ते न्याय मिळवून देऊ, आज एक दिवस दुकान बंद ठेवा आणि उद्या तुम्हाला निर्णय सांगतो म्हणून सर्व व्यापारी वर्गाला सांगितले.
ह्यावेळी दुधनी गावचे व्यापारी सिध्दाराम येगदी, कल्याणी कल्याणशेट्टी, सिध्दाराम झळक्की, मुन्ना मणियार, दवलप्पा हौदे, अनंत कासार, प्रशांत लोणी, चन्नप्पा कोतली, श्याम मंथा, आदी सर्व व्यापारी वर्ग उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!