सांगवी व वागदरी येथील मृत्यूजय दूताना प्रशिक्षण
अक्कलकोट(वीरभद्र पोतदार) हायवेवर किंवा अन्यत्र कुठे झाला की लोक पोलिसांचा ससेमिरा नको म्हणून मदतीसाठी पुढे येत नाहीत या स्थितीत अपघातातील जखमींना वेळेवर मदत मिळावी यासाठी १ मार्च २०२१ रोजी राज्यात हायवे मृत्युजय दूत योजना सुरू करण्यात आली. त्याच अनुषंगाने डी जी ऑफिस च्या आदेशानुसार महामार्ग पोलीस मदत केंद्र पाकणी अंतर्गत अक्कलकोट तालुक्यातील वागदरी व सांगवी या गावातील मृत्यूजय दूताना शिरवळ आरोग्य केंद्रात प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी डॉ. शिवलीला माळी यांनी हायवेवर कोणत्याही प्रकारचे अपघात झाला की यावर कसा प्राथमिक उपचार करायचा या संदर्भात सविस्तर माहिती व प्रात्यक्षिक देखील दाखवण्यात आले यावेळी डॉ. रविकांत माने आरोग्य साहयीका सुनिता रावडे, आरोग्य सेवक नागनाथ होटकर, परिचर सतोष पवार, पंडित व्हनमाने, आरोग्य सेविका संगिता ढंगे, सरोजा तोळणूरे हे सर्व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
अपघात झाल्यास त्यांना तातडीने दवाखान्यात पोहचवणे , व या घटनेसंदर्भात संबधीत नजीकच्या महामार्ग पोलीस मदत केंद्रात कळविणे, या अशा कायदेविषयक मार्गदर्शन पो ना २८३ एस एस माने, व पो ना ९०७ सी ए कुंभार, महामार्ग मदत केंद्र पाकणी यांनी सविस्तर पणे उपस्थित मृत्यूजय दूताना माहिती दिली. अनेक महामार्गावर होणाऱ्या घटना पाहता पोलीस प्रशासनाने मृत्यूजय दूतांची नेमणूक केली असून, त्यांना डी जी ऑफिस च्या आदेशानुसार महामार्ग पोलीस मदत केंद्र पाकणी अंतर्गत वागदरी व सांगवी या गावातील मृत्यूजय दूताना प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी वागदरी येथील मृत्यूजय दूत म्हणून चिदानंद परीट, बसवराज कलशेट्टी, विजयकुमार शिंदे, शिवानंद पुरंत शरण शिंगे, यांची नेमणूक करण्यात आली असून, सांगवी करिता प्रविणकुमार बाबर, जाकीर कागदे, रवी राठोड, अप्पाराव भोसले, पिंटू चव्हाण यांची नेमणूक करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!