आझाद मैदान मुंबई आंदोलन
उद्या ५ वा दिवस
मुंबई : मराठा आरक्षण स्थागिती पूर्वी निवडी पूर्ण झाल्या आहेत अश्या मराठा उमेदवारांच्या नियुक्तया शासनाने दयाव्यात यासाठी आज ५ वा दिवस आंदोलन सुरु आहे.
शासनाने वेळोवेळी बैठका घेऊन विषय सोडवू आणि नियुक्तया देऊन शासकीय सेवेमध्ये समावून घेऊ असे आश्वासन दिले होते.प्रशासनातील जातिवादी मराठा विरोधी लोक यासाठी वेळोवेळी अडकाठी निर्माण करत असल्याने या उमेदवार लोकांच्या नियुक्तया रखडल्या आहेत.2014 ESBC,2018 पासून समांतर आरक्षण आणि आता 2019 SEBC मधील मराठा उमेदवार पात्र असताना शासकीय सेवा पासून वंचित आहे.आज माझा संबंध नाही म्हणून घरात बसलात तर उद्या तुमच्या वर वेळ येईल तेव्हा इतर लोक ही हाच विचार करतील.आपल्या भविष्यातील हक्कासाठी आजच सज्ज होऊ या आपल्या बांधवाना सहकार्य करूया.
25 जानेवारी रोजी आझाद मैदानात शेतकरी आंदोलन निमित येणारे मा शरद पवार साहेब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब व त्यांचे सहकारी मंत्री लोक आपल्याला न्याय देतील अशी आशा करूया.आपल्या बांधवांची ताकत बनून त्यांच्या मागे उभा राहूया आणि एक मराठा लाख मराठा बनू शकतो हा मंत्र पुन्हा एकदा दाखवून देऊया.
मराठा सेवक समिती महाराष्ट्र
मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र
सकल मराठा समाज महाराष्ट्र
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!