ओ दादा माझा एक फोटो क्लिक करा ओ...!
आज फुलेवाडी येथे माने हॉल वर ऑर्ड करत होतो..दुपारी 4 वा.कपल फोटो शुट करण्याच्या गडबडीत होतो अचानक एक मतीमंद बाई हॉलच्या बाहेर आली आणि म्हणाली ओ दादा माझा बी एक फोटो काढा की, प्रसाद काय तयार होईना..मीच म्हंटलं ये भावा घे की..मग लगेच प्रसादने त्या लेडीजचे फोटो आपल्या कँमेरात क्लिक केले. मी त्या बाईंना म्हंटले फोटो काढून काय करनार तर मला म्हंटली माझं लग्न करायचं आहे..मला दाखवायला पाहीजे.मी मनात हसून प्रसाद ला फोटो काढायची विनंती केली.त्याचवेळी त्या मतिमंद महिलेने मला लगेच फोटो हवा मला तो फोटो दाखवायचा आहे..त्यावर प्रसादने उद्या फोटो मिळेल अशी प्रतीक्रिया दिली..
आयुष्यात कितीही आपण म्हातारे झालो तरी, लग्न हा विषय मरेपर्यंत संपत नाही..
माझ्या व्यवसायाच्या कारकिर्दीत कितीतरी लोक लग्नसमारंभात ऑर्डीरीसाठी बोलवतात.पण,सुरवाती पसून शेवट पर्यंत हा फोटोग्राफरच असतो..त्या मतिमंद मंगलाताईंनी फोटो काढून कदाचित फोटोग्राफरला ऑर्डर तर दिली नसावी हाच प्रश्न मला पडतो..कारण त्या बाई भिक मागून जर पाच रुपये मागत असतील आणि जर लग्नाची स्वप्ने बघत असतील.तर त्यात तीचा काय गुन्हा..? प्रत्येकाला वाटतं आपलं लग्न व्हावं..!
पण आजची फस्ट दुनया सर्व सामान्य लोकांकडून खुप अपेक्षा बाळगून असते..जसं की मुलगा सरकारी हवा,दहा एकरचा बागायतदार हवा..पण,शेती करायला नको..फक्त प्रॉपटी हवी.
असो,पण त्या मंगला बाईंनी फोटो काढून जी काय हौस पुरवली तीला तोड नाही..सरते शेवटी म्हनाली मुलगा निरवेशनी हवा..म्हणजे बघा त्या मतीमंद बाईची विचारसरणी किती विचार करण्यासारखी आहे..जातेवेळी मला फोटो प्रिंट हवी असं न सांगायला ही नाही डगमगली..
सलाम त्या भारतीय मातेला की, अशी कितीतरी भारतात लग्नासाठी स्त्रिया असतील की, ज्यांना आपला भावी पती हवा म्हणून स्वप्न पाहत असतील....?
साईंट्या फिल्मस् कोल्हापूर
9527362406
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!