अभासेच्या सरचिटणीस आशाताई गवळींचा “कोव्हिड सोल्जर” म्हणून गौरव
अभासेच्या सरचिटणीस आशाताई गवळींचा
“कोव्हिड सोल्जर” म्हणून गौरव
मुंबई : कोरोनोच्या लॉकडाऊन काळात संपूर्ण
जग बंदिस्त असताना अभासेच्या सरचिटणीस सौ. आशाताई गवळी यांनी केलेल्या कार्याची
दख़ल घेऊन त्यांना आझाद भारत फौज-मुंबई कंपनीच्या वतीने “कोव्हिड सोल्जर” म्हणून
प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
त्यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांना
आपआपल्या भागात लॉकडाऊन मुळे उद्भवलेल्या समस्यांवर स्थानिक प्रशासनाच्या
आदेशानूसार मदत कार्य राबविले. अडकलेल्या लोकांना जेवणाचे डबे पूरविले, ईपास काढुन दिले, प्रशासानाला
मदत केली, मजुरांना त्यांच्या गावाला जाण्यासाठी
वाहन व्यवस्था केली. अशी अनेक कार्ये त्यांनी पार पाडली होती. याच कामाचा कार्य
अहवाल मुंबई जिल्हा कॅप्टन विकास मोरे यांनी आत्पाकालीन व्यवस्थापनचे कार्य
करणा-या आझाद भारत फौजला सादर केला होता. आझाद भारत फौजचे जीसीसी अमरसिंह राजे
यांनी स्वहस्ते सौ आशाताई गवळी यांना “कोव्हिड सोल्जर” प्रमाणपत्र देऊन
गौरव केला.
यावेळी जीसीसी अमरसिंह राजे, कॅप्टन विकास मोरे, पत्रकार विजय
पवार, प्रकल्प सुखदेव, हरिष हिरे, जावेदभाई
आणि कार्यकर्ते सामाजिक अंतर राखून उपस्थीत होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!