मोदीच्या कृपेने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इजिप्तच्या कांद्याची मागणी वाढली
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इजिप्तच्या कांद्याची मागणी वाढली
भारतीय कांद्याची निर्यात बंदीचा परिणाम...
भारताच्या कांदा निर्यात बंदी मुळे इजिप्तला आंतरराष्ट्रीय ऑर्डर मिळविण्याची संधी मिळाली आहे. कांद्यावरील भारतीय निर्यात बंदीचा इतर सर्व कांदा निर्यात करणार्या देशांवर सकारात्मक परिणाम झाला आहे. काही दिवसांपूर्वी कांद्याची मागणी सरासरी पातळीवर होती, आता त्यात लक्षणीय वाढ झाली आहे.
मोहम्मद एल्खतीब ह्या इजिप्शियन कांदा निर्यातदारांची प्रतिनिधी ने फ्रेशफ्रूट प्लाझा बरोबर बोलताना सांगितले " इजिप्तमध्ये कांद्यासाठीचा हंगाम आतापर्यंत सर्वसाधारण होता, मागणी पाहिजे तितकी चांगली नव्हती. परंतु भारत सरकारने देशातील कांद्याच्या निर्यातीला बंदी घातली असल्याने आमच्या कांद्याची मागणी वाढली आहे. त्याचबरोबर भारत इजिप्तमधूनही कांदा आयात करून स्थानिक कांद्याचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न करू शकतो. इजिप्शियन कांद्याच्या किंमती आतापर्यंत खूप बदललेल्या नाहीत परंतु भारतातल्या बातम्यांमुळे आम्ही येत्या काही दिवसांत किंमती वाढण्याची अपेक्षा करत आहोत. हा मागणी वाढलेल्याचा हा एक नैसर्गिक परिणाम आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!