३१ मे नंतरही लॉकडाऊन उठवणार नाही, उद्धव ठाकरेंचे संकेत.
(दीपक भातुसे, झी मीडिया),
मुंबई: लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मे रोजी संपत असताना त्यानंतर लॉकडाऊन पूर्णपण उठवला जाणार नाही, असे स्पष्ट संकेत मुख्य़मंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांकडून राज्यातील स्थितीचा आढावा घेतला. राज्यातील अर्थचक्र सुरु करण्यासाठी ३१ मे नंतर लॉकडाऊनध्ये आणखी शिथिलता दिली जाईल असे त्यांनी स्पष्ट केलंय. ग्रीन झोनमध्ये बऱ्यापैकी व्यवहार सुरु करण्याचा राज्याचा विचार आहे. मात्र, यासाठी काही निमय व अटी निश्चित घालण्यात येणार आहेत. नियम व अटींचे उल्लंघन केल्यास हे व्यवहार बंद केले जातील याची कल्पना नागरिकांना देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्यात. ८० टक्के लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत, स्थलांतरित आणि लॉकडाऊन शिथिल केल्याने प्रवास करीत असलेल्या नागरिकांमुळे ज्या जिल्ह्यांत रुग्ण नव्हते तिथेही प्रादुर्भाव दिसू लागला आहे. एकीकडे राज्याचे अर्थचक्र सुरु करीत असलो तरी त्यामुळे आपल्यावरील जबाबदारी अधिक वाढते हे लक्षात घेऊन विषाणूचा पाठलाग जास्त गांभीर्याने करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या व्हि.डी.ओ. कॉन्फरन्समध्ये दिले. याप्रसंगी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील सर्व नागरिकांना कॅशलेस उपचार देणाऱ्या महात्मा फुले जन आरोग्य या देशातील महत्वाकांक्षी योजनेची जिल्ह्यांत काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे सांगितले. मुख्य सचिव अजोय मेहता यांनी देखील महत्वपूर्ण सूचना दिल्या. महाराष्ट्रातली रुग्ण संख्या मोठी असली तरी रुग्ण झपाट्याने बरेही होत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!