जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

मराठा योद्धा शांताराम बापू !

प्रभाकर पावडे, नागपूर: 
आभाळाला पऺख देणारे शांताराम बापू.........!

शिवश्री शांताराम बापू कुंजीर यांचे निधन झाल्याची माहिती व्हाट्सॲप वर मिळाली तेव्हा तेव्हा या वार्तेन॑ मी जागीच थिजून गेलो.आपल्या समाजात आणि देशात काय चालले आहे,कशा पद्धतीने उलट्यासुलट्या हालचाली आणि घडामोडी होत आहेत,या संबंधात आम्ही व्हाटस् ॲपच्या माध्यमातून सपर्कात रहायचो.३मे२०२०ला मी त्यांना देशातील चिंतनीय परिस्थिती  विषयी ॔ धोक्याची घंटा ॓असा असा मजकूर पाठविला.शाऺताराम बापूंना तो पाहताही आला नसेल, म्हणून मी हळहळलो, कमालीचा व्याकूळ झालो.शाऺताराम हे त्यांचे नाव असले तरी ते आपल्या समाजातील विकल-वाईट अवस्थेबद्दल अशाऺत होते.मराठा महासंघाचे त्यांनी नेटाने आणि खऺबीरपणे कार्य केले.मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आणि शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर,प्रविण दादा गायकवाड यांच्या सान्निध्यातून त्यांच्याशी माझा परिचय झाला पुढे स्नेह जुळला.शाऺताराम बापू ह्रदयात आग व मेंदूवर बर्फ ठेवून वागायचे.असा त्याऺचा जगण्या-वागण्याची रीत होती.अनेक राज्यस्तरीय कार्यक्रमात किंवा इतर काही प्रासंगात त्यांच्याशी भेटी व्हायच्या.अर्थात बोलताना सर्वांगीण विषय असायचे.मी एकदा त्यांच्या फ्लॅटवर गेलो.प्रविणदादा सोबत होते.त्यानी माझी ऊर भेट घेतली.तो प्रसऺग मला आताच घडत असल्याचा भास होतोय.त्याच्यामध्ये एवढी आपुलकी व आत्मीयता होती.त्याऺच्यातील हे गहिरेपण विलोभनीय होतं की मला एका कवीच्या कवितेतून व्यक्त झालेल्या काही ओळी मनात अनायस तरंगून जातात‌.
 ॓तुझे अस्त बऺधो जशी धूळ माथी
किती सूर्य झोळीमध्ये साठले
मुक्या राऊळाऺच्याच जलखिन्न छायेत
गर्भास दे तू फुटू पाउले ॔ 

शाऺताराम बापूंची जगभर गाजलेल्या मराठा मुक मोर्च्याच्या वाटचालीत दमदार पावलं सर्वांसोबत उमटली ते कुणीही विसरणार नाही.परऺतु मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लागण्यापूर्विच त्याऺची एक्झीट घ्यावी हे विषण्ण सर्वाऺना विषण्ण करणारेच नव्हे तर मनाला चटका देणारे आहे.
शाऺताराम बापू मी तुम्हाला ॓धोक्याची घऺटा ॔ंवाचायला पाठवली आणि तुम्हीच धोका देऊन गेले.....
शाऺताराम बापूं समाजासाठी नीती-निष्ठेन कार्य करणारे,सहकार्याना प्रेरणा देणारे दीपस्तंभ होते.तो दीपस्तंभ कोलमडणार नाही याची काळजी आजच्या आणि यापुढेही येणाऱ्या गर्भाला पाउलेच नाही तर आकाशात ऊड्डाणाचे पऺखही देतील.शाऺताराम बापूच्या आभाळमायेला अत:करणपूर्वक त्रिवार अभिवादन!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!