या मजुरांना समजवायचं कसं??
सबको घर छोड देंगे , असा संदेश यांच्यापर्यंत जायला हवा ....
परराज्यातील मजुरांना रेल्वेने घरी पाठवण्याचा खर्च महाराष्ट्र शासन करत आहे.या लोकांना जेवण आणि सुके खाद्य पदार्थ, पाणी हे पालकमंत्री ना.सतेज ( बंटी) पाटील साहेब यांच्या माध्यमातून सुरू आहे.
जेवण देण्याच्या नियोजनाच्या निमित्ताने आम्ही टीम सतेज दिवसभर रेल्वे स्टेशन ला आहोत. या लोकांच्या चेहऱ्यावरचे भीती , काळजी, सुस्कारा, आणि आनंदी हास्य हे भाव रेल्वे सुरू होईपर्यंत आम्ही पाहतोय.
पण रेल्वे स्टेशन बाहेर या मजुरांची होणारी गर्दी मात्र अस्वस्थ करणारी आहे. यातील काहींनी ऑनलाईन तर काहींनी गावात तलाठी यांच्याकडे माहिती दिली आहे.रेल्वे च्या क्षमतेनुसार प्रशासन या लोकांना येथे आणते.
पण यांच्यातला कोणाचा तरी बाकीच्यांना फोन जातो, " भैया आज यूपी , बिहार की गाडी है, हमे मेसेज आया है, हम जा राहे है | "
ऐकणारा बिथरतो आणि मिळेल त्या वाहनाने स्टेशन रोड वर येऊन थांबतो..
डोळ्यात आशा ठेऊन, की मला आत सोडतील, मी गावी जाईन.पण सीट फुल्ल झाल्याने यांना रेल्वेत प्रवेश देता येत नाही..
काल गुरूवारी 14 मे रोजी सकाळी आणि सायंकाळी यूपीला दोन ट्रेन गेल्या. साधारण आज 2900 लोक गावी यूपीला गेले.पण बाहेर स्टेशन रोडवर 250 ते 300 जण होते , याना समजवण्याचा प्रयत्न केल्यावर " साहब हमको छोडो, घर जाना है" हेच यांचं पालुपद.. खूप काही कारणे सांगून संधी मिळते का ?? याचा केविलवाणा प्रयत्न ते करत होते
...शेवटी पोलीस, प्रशासन यांना सोबत घेऊन यावर मार्ग काढायचा असे आमच्या टीम सतेज ने ठरवले..मी, रसाळे सर, डी. डी.पाटील,एस.एच.पाटील, विजय सूर्यवंशी , तानाजी लांडगे, विनायक सुर्यवंशी, अमर समर्थ ,महादेव मोरे, धनाजी, दीपक , पार्थ, प्रवीण,आनंदा, आदित्य पांडू उमेश आदींनी चर्चा केली. या सर्वांना आपण रस्त्यावरून हटकण्यापेक्षा जवळ असणाऱ्या काँग्रेस कमिटीत नेऊया अशी विनंती पोलिसांना केली.
काँग्रेस कमिटीच्या हॉल मध्ये या सर्वांची प्रांताधिकारी वैभव नावडकर, डीवायएसपी प्रेरणा कट्टे आणि आम्ही सर्वानी समजूत काढली.. "आने वाले चार पांच दिन मे आप सबको घर जाने का मौका जरूर मिलेगा" , हे आश्वासक शब्द ऐकून हे मजूर थोडे रिलॅक्स झाले. प्रांताधिकारी नावडकर यांनी त्यांना तुम्हाला प्रशासन रेल्वेस्टेशन पर्यंत येण्यासाठी बस ची व्यवस्था करेल , त्याच वेळी या, असे सागीतले. महापालिका उपअभियंता हर्षजीत घाटगे हेसुद्धा येथे आले.
मग या सर्वांनी यातील काहींना बसने परत जेथून आले त्या ठिकाणी पाठवले, ज्यांची व्यवस्था नाही त्यांना निवारा केंद्रात पाठवले आणी एक बस रात्री मध्यप्रदेश ला गेली...
हे सर्व निस्तरताना प्रशासन आणि पोलीस यांची तारांबळ उडत आहे.पण आमची *टीम सतेज* या परिस्थितीत पोलीस आणि प्रशासन याना साथ द्यायला कटिबद्ध आहे..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!