लोकांच्या जीवापेक्षा सत्ता आणि राजकारण मोठे करू नका.
आज संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने हांहाकार माजला आहे. त्याची सुरुवात चीन पासून झाली. चीन हा देश तसं पाहिले तर आपल्या देशापेक्षा प्रगत देश तरी देखील त्या देशात या आजाराने लाखो लोकांना जखडले आणि हजारो लोकांचे जीव गेले. हिच परिस्थिती इटली, फ्रान्स, अमेरिका, जर्मनी सारख्या प्रगत देशात सुद्धा पहायला मिळते. आज जगभरात जवळपास 180 ते 200 देशात हा व्हायरस पसरला आहे. ज्यावेळी या व्हायरसने चीन मध्ये सुरुवात केली. तेव्हा जी हालचाल चीन मध्ये सुरू होती तेव्हा आपल्या देशातील स्वतःला अति हुशार तज्ञ समजणारी मंडळी काय फक्त डोळ्यांनी मजा लुटत होतीत काय. हा व्हायरस आपल्या देशात सुद्धा येण्याची शक्यता आहे ! असं यांच्या अति प्रगल्भ डोक्यात कसं काय आलं नसावं.? जर आलं असेल तर तो कोणत्या मार्गाने, कोणाच्या बरोबर येऊ शकतो यावर विचार का केला गेला नाही. ? आणि जर केला असेलच तर तो हवाई मार्गे म्हणजे विमानाने व जल मार्गे म्हणजे जहाजातून येणाऱ्या प्रवाशांसोबत येईल असे असताना त्या त्या ठिकाणी त्या येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांना तपासून व 14 ते 15 दिवस विलीगिकरण कक्षात ठेवण्याची वेळेतच सोय का केली गेली नाही .? त्याचवेळी केली असती तर कदाचित देशात हि आजची परिस्थिती निर्माण झाली नसती.
बर ठीक आहे झाली असेल चूक माणूसच आहेत म्हणून लोकांनी समजून घेतले. पण आज महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोना बाधित रुग्ण आहेत. पण महाराष्ट्रात त्यासाठी आवश्यक असणाऱ्या टेस्टिंग लॅब फक्त सातच आहेत. 36 जिल्हे असणाऱ्या राज्यात फक्त 7 लॅब मध्ये टेस्टिंग कसे शक्य आहे. त्यासाठी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांनी आत्ताच्या प्रत्येक मुलाखतीत सांगितले की टेस्टिंग लॅब वाढविण्यासाठी केंद्राची परवानगी लागते आम्ही वारंवार तातडीची मागणी करतोय परंतु अजूनही केंद्र सरकारने टेस्टिंग लॅब वाढविण्यासाठी राज्य सरकारला परवानगी दिलेली नाही. का तर महाराष्ट्रात भाजपचे सरकार नाही म्हणूनच परवानगी द्यायला मुद्दाम उशीर चाललाय ना. आज देशात सॅनिटायझरचा खूप मोठ्या प्रमाणात तुटवडा झाला आहे त्यासाठी महाराष्ट्रातील जे साखर कारखाने अल्कोहोल निर्माण करतात त्यांना सॅनिटायझरचे उत्पादन करण्यासाठी परवानगी द्यावी म्हणून ad. योगेश पांडे यांनी सरकारशी पत्र व्यवहार सुद्धा केला आहे तरीही अजून दखल घेतली गेली नाही. लोकांच्या जीवापेक्षा तुम्हाला जर सत्ताच जवळची वाटत असेल तर जे लोक यांना सपोर्ट करतात त्यांनी नक्कीच यावर विचार करायला हवा. कारण हा व्हायरस कोण कोणत्या पक्षाचा आहे हे पहात नाही हे लक्षात घ्यायला हवं.
आज महाराष्ट्रातील मुंबई हि देशाची आर्थिक राजधानी आहे आणि केंद्राच्या तिजोरीत पडणाऱ्या पैशाच्या बाबतीत बाकीच्या राज्यांपेक्षा महाराष्ट्रचा वाटा हा जवळपास निम्मा आहे. जर महाराष्ट्र थांबला आणि मुंबई थांबली तर त्याचा परिणाम हा संपूर्ण देशावर होणार हे या लोकांना का कळत नाही.
महाराष्ट्र राज्याला केंद्रसरकार ने विशेष मदत लवकरात लवकर करणे काळाची गरज आहे. डॉक्टर, प्रशासन आणि संशोधक मंडळींना ताबडतोब लागेल त्या परवानग्या आणि आर्थिक मदत देण्यासाठी नमो नी प्रथम प्राधान्य देणे गरजेचे आहे.
हे संकट जगावरील आहे आणि भारत हा या जगाचा अविभाज्य घटक आहे.
तसेच #गोमय #गोमूत्र #गोमांस(गोश) #नाद_ब्रम्हनांद #होलीवॉटर अशा फालतू पोस्ट द्वारे अफवा पसरवण्याऱ्यावर तात्काळ कारवाईचे आदेश पोलीस महासंचालकांनी द्यावेत.
सर्वच धर्माच्या ठेकेदारांनी स्वतःची दलाली आणि धार्मिक ठेकेदारी ह्या काळात तरी कमी करावी.
:- अमरसिंह राजे
मागे ज्यावेळी 2019 मध्ये सातारा, सांगली व कोल्हापूर येथे महापूर आला होता त्यावेळी भाजप सरकार सत्तेवर होते राज्यातील फक्त 3 जिल्ह्यात महापूर आला सांगली, कोल्हापूरची तर अवस्था एकदम विदारक झाली होती गावंच्या गावं 8 ते 10 दिवस पाण्यात होती पण त्यावेळचे सत्ताधारी मात्र प्रचारात मग्न होते. पण त्यावेळी इतर सर्वच पक्षाचे लोक प्रचार लगेच बंद करून लोकांच्या मदतीला धावले जेवढी मदत करता येईल तेवढी केली महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेनेही मदतीचा महापूर सुरू केला तेव्हा उशिरा का होईना भाजप वाल्या लोकांना जाग आली आणि तेही मदतीला धावले परंतु त्यांनी त्यावेळी नको ते केले कोण सेल्फी घेण्यासाठी धडपड करत होते तर कोण मुद्दाम एखाद्याला पाण्यात सोडून वाचवल्याचा वाव आणत होतं आणि तेही फक्त कॅमेऱ्यापुढे आणि हेहि थोडं होतं की काय लोकांनी जी जीवनावश्यक वस्तूंची पॅकिंग करून दिली होती त्यावरती या भाजपच्या लोकांनी पक्षाच्या जाहिराती चिटकवून ती पाकिटे वाटण्यात आली जणू हे सर्व त्यांनीच दिले आहे असं वाटावं म्हणून.
खरंच त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले कि भाजपचे लोक किती निर्दयी आहेत ते पण आजची परिस्थिती हि 3, 4 जिल्ह्यात नाही तर संपूर्ण देशात आहे हे लक्षात घ्या उगाच नको त्या वेळी राजकारण आणि राजकीय सूडबुद्धीने वागू नका लोकांच्या जीवापेक्षा सत्तेला आणि राजकारणाला जास्त महत्त्व देऊ नका. अगोदरच देश खूप मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे त्यामध्ये आणि या व्हायरस मुळे आपल्या देशाचे खूप नुकसान होणार आहे. हे समजून घ्या आणि दुजाभाव न करता लोकहिताचे निर्णय लवकर घ्या जसे तुम्ही एका रात्रीत नोटबंदी केली, जसे 370, 35 A तशाच पध्दतीने आज योग्य आणि तातडीचे निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे.
अपेक्षा करतो देव आपणांस सुबुद्धी देवो
श्री. प्रमोदसिंह जगदाळे
तालुकाध्यक्ष
स्वाभिमानी शेतकरी संघटना , कराड उत्तर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!