जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

अक्कलकोट तहसील बनतय विकासाचं रोल मॉडेल


अक्कलकोट दि.२८ : अक्कलकोट तालुक्यातील तहसील कार्यालयाचा चेहरा मोहरा लोकसहभागातून व शासनाच्या तुटपुंज्या निधीतून तहसीलदार कार्यालयात व परिसरात अनेक विविध प्रकारची विकास कामे होऊन तहसील कार्यालयाचा रुपडे पालटले असून, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून तहसीलदार अंजली मरोड ख्याती असून, त्यांनी प्रशासकीय सेवेतून तहसील कार्यालय अतिशय सुंदर आणि सुसज्ज  असे बनवले आहे. तहसीलदारांच्या चेंबरमध्ये जाताच न्यायालयात आल्यासारखे वाटते. जुन्या तहसील कार्यालयातील टाकाऊ सागवानी लकडातून दिमाखदार डायस बनविण्यात आले आहे.
       गेल्या सहा महिन्यांत अक्कलकोट तहसील कार्यालयात अनेक बदल घडले आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात या तहसील कार्यालयालयाला संपूर्ण तारेचे कंपाउंड केले असून, आणि विशेष म्हणजे, लाखो रुपये खर्च करून कार्यालयाच्या आवारात डोम तयार करण्यात आला आहे. प्रत्येक निवडणूकीच्या वेळी तहसील प्रशासनाला निवडणूक कामाकरिता जागा भाड्याने घ्यावे लागत असत, पण आता शासकीय व खासगी बैठकीची सोय झाल्याने आता हा प्रश्न सुटला असून, रेन वॉटर हार्वेस्टिंग चे काम देखील पूर्ण झाले आहे. तहसील कार्यालयालयाच्या आवारात १०० हुन अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. आणि सुंदर अशी बगीचाही तयार करण्यात येणार आहे. नागरिकांच्या सोयीसाठी वॊटर कुलर श्री स्वामी समर्थ अन्नक्षत्र मंडळाकडून तहसील कार्यालयाला भेट देण्यात आला आहे. तहसिल कार्यालयाच्या आवारात पाच पोर्ट्रेबल कबिन बनविण्यात आली आहेत, मुक्कामी ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना थांबण्याची सोय झाली आहे. तसेच प्रतीक्षालयात नागरिकांना बसण्यासाठी आयडी बँक अक्कलकोट शाखेच्या वतीने स्टील बाकडे देण्यात आले आहेत.
        तहसीलदार अंजली मरोड यांची संकल्पना आणि कृती त्याला उपविभागीय अधिकारी प्रांत ज्योती पाटील यांचे मार्गदर्शन लाभल्यामुळे तहसील कार्यालयात आमूलाग्र बदल होत आहे. त्याची चर्चा सध्या शहर आणि परिसरात च नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे.
           एखादी गोष्ट चांगली व्हावी. यासाठी जसा एखादा ध्येयवेडा माणूस  काम करतो तशा पद्धतीचे काम तहसीलदार अंजली मरोड यांनी करून दाखविले आहे. तसे पाहिले तर अंजली मरोड येण्यापूर्वी तहसील कार्यालयाची अवस्था विचार करण्यासारखी होती. उन्हाळ्यात काटा किर्रर्रर्र...पावसाळ्यात वाट नाही. अशी अवस्था तहसील ची होती.
               लोकसहभाग व शासकीय निधींच्या पाठिंब्यामुळे आता हे तहसील कार्यालय तंत्रज्ञानेने व सुंदर अशा देखाव्यात सुसज्ज झाले आहे. एकूण चित्र पाहिले तर अक्कलकोट शहरात आता चांगल्या बदलास सुरुवात झाली असेच म्हणावे लागेल.


लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळात या विविध विकास कामास  सुरुवात झाली असून, ती आता अत्यल्प काळात पूर्णत्वास जाईल, ही विकास कामे काही दानशूर व्यक्ती आणि शासकीय निधीतून आणि संस्थेच्या माध्यमातून झाली आहेत.  बहुतांश कामे मार्गी लागली असून, उर्वरित कामे लवकरच पूर्ण होतील. तहसीलदार - अंजली मरोड, अक्कलकोट.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!