सावधान!!! सावधान!!!! सावधान!!!!!
काही समाजकंटक खूप गरजू लोकांवर वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून जाळ्यात पकडत आहेत. आपण एखाद्या पोस्ट मधील माहिती वाचतो आणि आपल्याला वाटते की ही माहिती पुढं पाठवली तर अनेकांना याचा लाभ होईल. पण सत्य तर भलतेच असते. अशा खुपसाऱ्या फिशिंगसाईट असतात ज्या गरजवंताची आत्ताची गरज समजून बनवलेल्या असतात. तिथे आपली खाजगी माहिती म्हणजे आधार कार्ड, मोबाईल नंबर वगैरे विचारले जाते. आपण त्यामध्ये सर्व माहिती देऊन टाकतो. कदाचित ती माहिती एकत्र करून दुसऱ्या कंपन्यांना विकतात. ते स्वतः अथवा नंतर कोणीतरी त्याचा वापर करून आपले आर्थिक नुकसान करू शकतात.
शासकीय वेबसाईट उदाहरणार्थ
सावधान!!!!
जर आपण शासकीय गोष्टींचा अथवा योजनांचा पाठपुरावा करत असाल तर त्या वेबसाईटचा शेवट .gov.in किव्हा nic.in ने झाला आहे का हे नक्की पहा. काहीच वेबसाईट आहेत ज्या gov.in ने शेवट होत नाहीत म्हणजे .org अथवा .in त्यावर सखोल चौकशी करूनच तिथे माहिती द्या.
उदा. खालील माहितीमध्ये जी वेबसाईट लिहले आहे ते blogspot.com जे कोणीतरी असाच चोर आहे.
प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना 2021के लिए प्री-रजिस्ट्रेशन हो रहा है, इस योजना के अंतर्गत सभी युवा बेरोजगारों को 3500 रुपये हर महीने दिया जाएगा प्री-रजिस्ट्रेशन करने के लिए निचे दिए गए लिंक पर क्लिक कर अपना फॉर्म भरे
आवेदन शुल्क - 00 Rs (FREE)
योग्यता - 10वी पास
आयु- 18 से 40 वर्ष
रजिस्ट्रेशन की लास्ट डेट - 20 मई 2021
ऑनलाइन रजिस्ट्रेशन यहां से करें
सरकारी वेबसाईटवर येणाऱ्या योजना पसरवणे योग्य आहे जेणेकरून आपल्या सर्वांना तशा योजनांचा लाभ घेता याव्यात. परंतु, आपण एखादी लिंक फॉरवर्ड करत असताना काळजी घेतली नाही तर आपल्या जवळच्या व्यक्तीला आर्थिक हानी होऊ शकते.
--- आशिष उर्फ दत्ताजीराव घोरपडे
ही माहिती मात्र नक्कीच आपल्या जवळच्या व्यक्ती परियन्त पोहचवा... कदाचित त्यांची कोठे फसवणूक होणार नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!