राज्यात कोरोना सदृश्य परिस्थितीत सर्व औषधे 'टॕक्स फ्री' करा - संभाजी ब्रिगेड
राज्यात कोरोना सदृश्य परिस्थितीत सर्व औषधे 'टॕक्स फ्री' करा... - संभाजी ब्रिगेड
कोरोना महामारी'च्या रूपाने महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्ती आली आहे. महामारी चे प्रमाण वाढल्यामुळे सामाजिक जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागील सन २०२० वर्षापासून लॉकडाऊन काळामुळे बहुतांश सर्वच सामान्य नागरिकांचे जीवन जगणे असह्य झाले असून जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कुटुंबासह सर्वांना जगण्यासाठी प्रचंड आर्थिक अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे जगण्याचा गंभीर प्रश्न सामान्य माणसावर उद्भवला आहे. त्या Covid-19 अर्थात कोरोना महामारी मुळे वैद्यकीय उपचारावर रुग्णालयात लाखो रुपयांचा खर्चाचा बोजा प्रत्येक व्यक्तीला सहन करावा लागत आहे. अशा नाजूक परिस्थिती केंद्र व राज्य सरकारने राज्यात सर्व औषधे हे 'टॕक्स फ्री' करावीत व सर्व सामान्य माणसाला या संकटाच्या काळात दिलासा द्यावा... अशी संभाजी ब्रिगेड महाराष्ट्राच्या वतीने मागणी करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात मनोरंजनासाठी चित्रपट टॅक्स फ्री केले जातात, याच धर्तीवर माणसं जिवंत ठेवण्यासाठी सध्याच्या महामारीत व आणीबाणी सदृश्य परिस्थिती मध्ये सर्व औषधे 'टॅक्स फ्री' करणे गरजेचे वाटते. म्हणून महाराष्ट्र सरकारने राज्यात औषधे 'टॅक्स फ्री' केली पाहिजेत... या मागणीचा मुख्यमंत्री मा. उध्दव ठाकरे यांनी गांभिर्याने विचार करावा व तात्काळ निर्णय घ्यावा म्हणून याबाबत संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करणार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!