शिरोली येथे श्री श्रीमंधर कोविड केअर सेंटर आज पुन्हा सुरु करण्यात आले.
कोल्हापूर: कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शिरोली येथे श्री श्रीमंधर कोविड केअर सेंटर आज पुन्हा सुरु करण्यात आले.
कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा उपक्रम सामाजिक दृष्ट्या खूप चांगला आहे. पण, अशा प्रकारच्या कोवीड सेंटरची आणखी उभारणी करावी लागू नये हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना. गेल्यावर्षी याच सेंटरमधून सुमारे ५०० कोरोना रुग्ण चांगल्या प्रकारे उपचार घेऊन घरी गेले आहेत. याबद्दल मी संयोजकांचे मनापासून आभार मानतो. कोल्हापुरातील कोरोना परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन असून प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. परंतु, दुर्दैवाने रुग्णसंख्या वाढली तर रुग्णांना सर्व आवश्यक गोष्टी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, आमदार राजूबाबा आवळे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे, फारुख देसाई, तालुका आरोग्य अधिकारी सुहास कोरे, शिरोली पोलीस ठाण्याचे प्रभारी अंबले, पोलीस उपनिरीक्षक अतुल लोखंडे, शिरोली ट्रस्टचे अध्यक्ष शंभुनाथ जयश्री कांबळे, डॉ. निरंजन राठोड, अक्षय बाफना, जितेंद्र गांधी, कुमार राठोड, अमर गांधी, भरत ओसवाल, महेश चव्हाण, हिम्मत ओसवाल, प्रांताधिकारी विकास खरात, तहसीलदार प्रदीप उबाळे, तलाठी निलेश चौगुले आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!