एसबीआय बॅंकेच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांस अपमानास्पद वागणूक
लोहयात एसबीआय बॅंकेच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांस अपमानास्पद वागणूक ; दलालांस झुकते माप -- शेतकऱ्यांची उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार
लोहा(संतोष चेऊलवार)
आपल्या भारत देशातील सर्वात मोठी व राष्ट्रीयकृत बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा लोहा येथील शेती कर्ज विभागाचे अधिकारी यांनी बॅंक आपली खाजगी मालमत्ता समजून जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजा वर हिटलरशाही सारखी वर्तणूक करून आरे तुरे ची भाषा वापरून चार चौघात अपमानीत करीत आहेत बँके शाखे जवळील एटीएम बरेच दिवसापासून बंद आहे,पासबुकवर इंट्री मारून मिळत नाही याकडे बँका अधिकाऱ्याचे लक्ष नाही बँकेत गेल्यावर सामान्य व गोरगरीब नागरिकांना नीट वागणूक देत नाहीत तर दलालांकडून ठराविक रक्कम घेऊन त्यांच्या फाईली मंजूर करीत आहे बॅंकेत दलालांचा सुळसुळाट झाला आहे अशी माहिती लोहा तालुक्यातील मौजे सायाळ येथील जेष्ठ शेतकरी संभाजी धोंडीबा पवार यांनी सांगितले व याबाबत उपविभागीय अधिकारी कंधार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली आहे.
उपविभागीय अधिकारी कंधार यांच्याकडे दिलेल्या निवेदनात त्यांनी पुढे असे नमूद केले की, महात्मा ज्योतिबा फुले कर्ज मुक्ती योजना २०१९ नुसार पिक कर्जाची बाकी मागितल्यास कर्ज विभागातील मामीड यांनी माझ्या खात्याचे स्टेटमेंट न देता मला अपमान जनक वागणूक दिली.माझे सेंवहीग तसेच कर्ज खाते एसबीआय शाखा लोहा येथे आहे. ज्याचा कर्ज खाते क्रमांक ३२९४१४७९६४२ असा असुन मी २०१६-१७ मध्ये एसबीआय शाखा लोहा यांच्याकडून कर्ज घेतले आहे.पण सदर खात्याचे २०१९ च्या कर्ज माफीच्या अंतिम यादीत माझे नाव न आल्यामुळे मी दि.२९-१-२०२१ रोजी एसबीआय शाखा लोहा येथे गेलो असता सदर बॅंकेचे शेती कर्ज विभागाचे अधिकारी मामीड यांना भेटलो असता व माझ्या खात्याचे विवरण मागितले असता मामीड यांनी मला माझ्या कर्ज खात्याचे स्टेटमेंट न देता मला अपमान जनक वागणूक दिली व मला कर्ज विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आम्ही तुम्हाला कसलीच माहिती तोंडी अथवा लेखी देऊ शकत नाही असे सांगितले व मला बॅंकेच्या बाहेर जा असे सांगितले.माझे कर्ज किती माफ झाले व आता किती रक्कम भरायची आहे हे त्यामुळे कळू शकले नाही.
तेव्हा उपविभागीय अधिकारी कंधार यांनी माझ्या अर्जाची दखल घेऊन मला न्याय द्यावा एसबीआय शाखा लोहा येथील कर्ज विभागाचे अधिकारी मामीड यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सायाळ येथील शेतकरी संभाजी धोंडीबा पवार यांनी उपविभागीय अधिकारी कंधार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनाच्या प्रती तहसीलदार व सहाय्यक निबंधक लोहा यांना ही दिल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!