दुधनी शहरात रॅली पुरते दुकाने बंद, नंतर सर्व कामकाज सुरू!
दुधनी शहरात रॅली पुरते दुकाने बंद, नंतर सर्व कामकाज सुरू !
दुधनी:- भारत बंद आंदोलनामध्ये आज दुधनी शहरात सकाळी 8 ते 11 पर्यंत मेन रोड वरील सर्व दुकाने बंद होती, माञ आज दुधनीचा आठवडी बाजार सुध्दा होता त्यामुळे आज दुधनी शहरात मेन रोड बाजुचे सर्व दुकाने बंद होती पण भाजीपाला मार्केट व त्या भागातील सर्व दुकाने सकाळ पासून चालूच होते.
भारत बंद आंदोलनामध्ये दुधनीतील 20 टक्के व्यापारी वर्ग व 5 टक्के पेक्षा कमी शेतकरी वर्ग या रॅली मध्ये सहभागी होऊन प्रतिसाद दिले. दुधनी शहरात आज सकाळी 10ते 11या वेळेत अक्कलकोट तालुक्याचे शहराध्यक्ष मा.श्री. शंकर म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली हा रॅली काढण्यात आली, विशेष म्हणजे दुधनी म्हंटले की सिध्दाराम म्हेत्रे यांचे बालेकिल्रा शहर म्हणून म्हंटले जाते पण आज ह्या बालेकिल्र्याची विट घसरताना दिसत आहे. तसेच शेतकरी कुटुंब आज आठवडा बाजार असल्याने ते ही नाराजी व्यक्त केली आहे की उद्या मंगळवार बाजार आहे आणि आम्ही शेतातुन भाजीपाला वगैरे कापुन आणले आहे बाजार बंद केले तर आम्ही विकायचा कुठे नाही विकला तर त्याचा नुकसान भरपाई कोण देणार एक तर कोरोनाच्या काळात शेत मालाची नुकसान झाले आहे तेव्हा कुठला सरकार आमच्या शेतकरी च्या नावाने आंदोलन काढले नाही ते आता का?तसेच आता आम्हाला कुठल्याही सरकारचा ञास नसुन आमच्या शेतमालाची हमी भाव कुठलाही आडत व्यापारी देत नाही त्यामुळे आम्ही ह्या आंदोलनात सहभागी झालो नाही असे ही शेतकरी वर्गांचे म्हणणे आहे.व सर्व शेतकरी बांधव तर्फे आम्ही सर्व पक्षांना विनंती करतो की तुमच्या एकमेकांच्या पक्षांन विरोधात झालेली मतभेद आणि त्या वरील आक्रोश आम्हा शेतकरी व गरीब लोकांना नुकसान न करता तुमचे समस्या तुम्ही बघुन घ्या माञ आम्हाला भिष्माला वध करण्यासाठी जसे अर्जुन व श्रीकृष्ण मिळुन शिखंडीला समोर केले तसे ह्या पुढे शेतकरी व गरीब व्यापारी वर्ग ह्यांना समोर करु नका असे दुखःद शब्द शेतकरी व गरीब व्यापारी वर्ग व्यक्त करत आहेत. माञ आजच्या या भारत बंद ला दुधनी शहरातील व्यापारी व शेतकरी वर्ग हे 30 टक्के प्रतिसाद दिले असुन 70 टक्के व्यापारी व शेतकरी वर्ग हे सर्व पक्षांनवर नाराजी व्यक्त करत आपले व्यवसाय चालू ठेवले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!