प्रतिबिंब नाही पाण्यामधले मन वाटे हे भक्तांचे!
प्रत्येक वेळी जाणिव करून देतेस की अंतर्बाह्य सगळीकडे तूच वसली आहेस. तरी सुद्धा आई आता तुझ्या सगुण मूर्तीच्या दर्शनाची आस लागलीय पुरे कर हे विनाशाच तांडव आणि कर पुन्हा सृजनाचा पदन्यास या टपो-या थेंबांच्या तालावर . पुन्हा निर्माण कर नवा भवताल पंच महाभूतांना नियंत्रित ठेवत. पुन्हा सगळं जग आनंदानं भरून टाक. योग्य काली योग्य प्रमाणात पर्जन्य दे पृथ्वी सस्यशालिनी कर आई आता तरी लेकरांवर दया कर आता तरी लेकरांवर दया कर*
( कोल्हापुरात पावसाने लावलेल्या हजेरीमुळे साठलेल्या पाण्यात पडलेलं हे जगदंबेच्या त्रिकुट प्रासादाच प्रतिबिंब आणि ते पाहून मनात उठलेले भाव तरंग) छायाचित्र. Vam studio
शब्दांकन अॅड. प्रसन्न विश्वंभर मालेकर कोल्हापूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!