हे काम नोहे येरागबाळ्याचे । इथे हवेत जातींचेच ।। संत तुकाराम महाराज
स्वयंसेवक म्हणजे कोण ?
1. समाजासाठी स्वतःचा बहुमूल्य वेळ विना मोबदला खर्ची करणारा व्यक्ती म्हणजे स्वयंसेवक होय. ( Time is Money)
2. स्थानिक पातळीवर मदत कार्य राबविण्याची जबाबदारी ही शासकीय कर्मचारी, अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकारी यांचीच असते.
3.परिस्थिती वर नियंत्रण ठेवणे कमी योग्य वेळेत नियोजन करण्याच्या जबाबदारीचा ताण हा मुद्दा क्रमांक 2 यांच्या वर असतो. अतिरिक्त ताणामुळे कार्य वेळेत आणि सुरळीत पार पडेल याची सरकारला ग्वाही नसते, म्हणून शासन स्वयंसेवी संस्था किंवा व्यक्तींना स्वयंसेवक म्हणून काम करण्याचे आवाहन करते.जेणेकरून वर उल्लेखित लोकांच्या जबाबदारीचा ताण कमी व्हावा.
4. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, अधिकाऱ्यांना आपले कर्तव्य सुयोग्यपणे निभावून नेता यावे...नियोजन करण्यासाठी मुद्दा क्रमांक 2 यांना उसंत मिळावी हा या मागचा सरकारचा उद्देश असतो.
5. मुद्दा क्रमांक 2 मध्ये उल्लेख केलेल्या व्यक्तींना पगार, बोनस, भत्ता, विमा, फंड, ग्रॅच्युटी व इतर सुविधा सरकार देत असते. पण स्वयंसेवकांना कोणताही मोबदला मिळत नसतो.
6. मदतकार्य राबविताना दुर्दैवाने मृत्यू झाल्यास मुद्दा क्रमांक 2 मधील व्यक्तींना शासनाकडून अनेक सोयी सवलती दिल्या जातात. शहिदाचा दर्जा दिला जातो. पण स्वयंसेवकाला त्याच्या मृत्यूनंतर काहीही मिळत नाही.फक्त राजकीय चमकोगिरी करणारे घोषणाबाजी करून मोकळे होतात.
7. मुद्दा क्रमांक 2 यांना प्रमोशन, स्पेशल अलाऊन्स, मीडिया कव्हरेज मिळते, पण स्वयंसेवकाला या पैकी काहीही मिळत नाही.
8. स्वयंसेवक हा मुद्दा क्रमांक 2 मधील व्यक्तींना मदतच करत असतो.
9. स्वयंसेवक होण्यासाठी अंगात रग, धमक, जिद्द आणि समाजाच्या भल्यासाठी निःस्वार्थ भावनेने राबण्याची संस्कारी वृत्ती असावी लागते.
10. स्वनियंत्रण, स्वालंबन आणि स्वदेश या गांधीजीच्या व्रताचा अंगीकार करणारा स्वयंसेवक असतो.
11. मुद्दा क्रमांक 2 मधील व्यक्तींना त्यांच्या अधिकारामुळे समाजात आणि कुटुंबात सन्मान असतो. पण स्वयंसेवकाला "कशाला लष्कराच्या भाकऱ्या भाजत आहेस" असे म्हणून बोलणी खावी लागते. घरात, मित्रात आणि समाजात कुचेष्टा सहन करावी लागते, तरीही चांगल्या सुहृदयी स्वभावामुळे स्वयंसेवक आपली सेवा समाजासाठी देत असतो.
12. स्वयंसेवकांची कुचेष्टा करण्यासाठी सुशिक्षित, गर्भश्रीमंत लोकच आघाडीवर असतात. ही स्वतः तर काही करत नाहीत, पण करणाऱ्या व्यक्तींच्या चुका शोधून काढण्यात पटाईत असतात.
13. स्वयंसेवक हा प्रत्येक गोष्टीसाठी ट्रेंड नसतो, त्यामुळे मदत कार्य करत असताना कमी-जास्त चुका त्यांच्याही कडून होतात.
14. स्वयंसेवक हा स्वतःचा जीव धोक्यात घालून समाजसेवा करत असतो.
15. विषाणू जन्य साथींच्या आजारामध्ये शरीरावर गोळ्या झेलण्याचेच हे अग्निदिव्य स्वयंसेवक करत असतो.
16. जीम मध्ये जाऊन सिक्स पॅक बनवणारे आणि हत्यारांच्या जोरावर दहशत निर्माण करणारे दादा, भाई, डॉन, मुलींच्या गळ्यातले ताईत असलेल्या चॉकलेट हिरोंची सुद्धा अशा प्रसंगात चड्डी पिवळी होते पण साधारण प्रकृतीचा स्वयंसेवक हे मदतकार्य लीलया पार पाडतो.
17. स्वयंसेवकांची टर उडवणे सोकॉल्ड लोकांना सोपं असतं पण स्वयंसेवक म्हणून काम करणं सोपं नसतं.
18. स्वयंसेवक हा कोणत्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा नसतो तो माणूस म्हणून माणूसकीला जगविण्याचे काम करत असतो. डॉ कोटणीस हे त्याचे उत्तम उदाहरण.
19. चला स्वयंसेवक घडवूया । देशहित साधुया ।।
आझाद भारत फौज द्वारा जनहितार्थ जारी...!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!