जागतिक पत्रकार नोंदणी परिषदेची पहिली कायदा मसुदा सभा थायलंड मध्ये- अमरसिंह राजे
Labels:
International
जागतिक पत्रकार नोंदणी परिषदेची पहिली कायदा
मसुदा सभा थायलंड मध्ये- अमरसिंह राजे
मुंबई
: जगातील सर्व पत्रकारांची नोंदणी होणे कामी कार्यरत असलेल्या “वर्ल्ड जर्नलिस्ट
रजिस्ट्रेशन कौन्सिल” ची 2020 मधील पहिली अंतरराष्ट्रीय पत्रकार नोंदणी कायदा
मसुदा सभा थायलंड येथे होणार असून, त्यासाठी पत्रकार आणि पत्रकारितेला पाठिंबा देण्यार्यां
अभ्यासू लोकांनी यात सहभाग नोंदवावा असे आवाहन वर्ल्ड जर्नलिस्ट रजिस्ट्रेशन
कौन्सिल चे सहसंस्थापक साऊथ एशिया हेड अमरसिंह राजे यांनी मुंबई येथे केले.
या
एक दिवसीय मसुदा सभेचे थायलंडच्या मान्यवराच्या उपस्थितीत शपथ घेऊन कामकाज सुरू
होणार असून प्रत्येक पत्रकाराला फ्री प्रेस, ह्युमन राईट्स, लोकशाही आणि शांतता या
विषयावर मत प्रदर्शन मांडण्यास प्रत्येकी किमान साडेतीन मिनिटे अवधी मिळणार असून
रिसर्च पेपर सुद्धा सबमीट करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. या परिषदेला साऊथ एशियातील
पत्रकार व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उपस्थितांना कौन्सिल चे कायम सदस्यत्व
मिळणार आहे. कौन्सिल जगातील सुमारे 180 देशामध्ये पत्रकार नोंदणी कायदा व्हावा
यासाठी प्रयत्नशील आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!